#Budget2018 : अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 'या' महत्त्वाच्या घोषणा

#Budget2018 : अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 'या' महत्त्वाच्या घोषणा

यावर्षीच्या अर्थसंकल्पात 17 हजार कोटी इतके जास्त पैसे रेल्वेसाठी मंजूर करण्यात आले आहे.

  • Share this:

1 फेब्रुवारी : आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी रेल्वे संबंधीच्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 17 हजार कोटी इतके जास्त पैसे रेल्वेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वेसुविधांमध्ये मोठं डिजिटलायझेशन करण्यात आलं आहे. मागच्या अर्थसंकल्पात रेल्वेस्थानकांवर वायफाय बसवण्याची घोषणा केली होती. आता रेल्वेतसुद्धा वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे. एकीकडे आधुनिकतेवर भर देण्यात आलाय तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांवर आणि रेल्वे बिघाडांवर काही ठोस घोषणा करण्यात आल्या नाहीत.

एक नरज टाकूयात रेल्वेच्या महत्त्वाच्या तरतुदींवर...

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी खालील तरतुदी

- मुंबई लोकलसाठी ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- रेल्वेची अवस्था सुधारण्यासाठी रेल्वेवर 1 लाख 48 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

- रेल्वेच्या सगळ्या स्थानकांवरील ब्रॉडगेजचं (रेल्वे रुळ) जाळं बदलण्यात येणार आहे.

- वाढती लोकसंख्या पाहता मुंबईतील ९० किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे.

- सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

- 600 रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्यात येणार आहे.

- 25 हजारांपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या स्टेशन्सवर एक्सलेटर बसवण्यात येणार आहे.

- रेल्वेच्या 4 हजार किमीचे विद्युतिकरण करण्यात येईल.

- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उघडण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 02:08 PM IST

ताज्या बातम्या