Budget2018 : गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन, पीएफमध्येही कपात

Budget2018 : गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन, पीएफमध्येही कपात

आर्थिक अहवाल सादर झाला तो गुलाबी रंगात. म्हणजेच महिला सशक्तीकरणाला हे बजेट प्राधान्य देईल, याचे संकेत होतेच.

  • Share this:

01 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपल्या बजेटमध्ये महिलांसाठी नवी घोषणा केलीय. महिला कर्मचाऱ्यांचा पीएफ 8 टक्के कापला जाईल. पूर्वी तो 12 टक्के कापला जायचा. त्यामुळे स्त्रियांच्या हातात पगाराची रक्कम जास्त येईल. तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये रोजगाराचं प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय.

आर्थिक अहवाल सादर झाला तो गुलाबी रंगात. म्हणजेच महिला सशक्तीकरणाला हे बजेट प्राधान्य देईल, याचे संकेत होतेच. त्याप्रमाणे 8 कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन मोफत देण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेत अगोदर 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळायचं. त्यात आता विस्तार केला गेलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 01:48 PM IST

ताज्या बातम्या