वातावरण तापल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी भारत-पाकला दिला आहे Special Message

दोन देशांमध्ये झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता संयुक्त राष्ट्रांनी भारत आणि पाकिस्तानला एक सल्ला दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 12:20 PM IST

वातावरण तापल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी भारत-पाकला दिला आहे Special Message

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताला प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी दिली आहे. यातून या दोन देशांमध्ये झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता संयुक्त राष्ट्रांनी भारत आणि पाकिस्तानला एक सल्ला दिला आहे.

'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा,' असं म्हणत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी भारत-पाकला शांततेचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम देखील ठार झाल्याची शक्यता आहे. कारण, बालाकोटध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटनांचे लॉचिंग पॅड उद्धवस्त केले.

Loading...

यातील जैशच्या तळाची जबाबदारी ही युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमकडे होती. हल्ल्यावेळी युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम हा तळावर होता अशी माहिती आहे.


VIDEO : पुलवामाचा घेतला बदला, CRPF जवानांनी असा केला जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 07:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...