Air Strike नंतर पुन्हा चकमक सुरू, भारताकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्ध्वस्त

Air Strike नंतर पुन्हा चकमक सुरू, भारताकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 27 फेब्रुवारी : भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम देखील ठार झाल्याची शक्यता आहे. कारण, बालाकोटध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटनांचे लॉचिंग पॅड उद्धवस्त केले. यातील जैशच्या तळाची जबाबदारी ही युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमकडे होती. हल्ल्यावेळी युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम हा तळावर होता अशी माहिती आहे.


AIRSTRIKE नंतर Air Missile चाचणीचा VIDEO आला समोर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 07:08 AM IST

ताज्या बातम्या