आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी, चीनमध्ये सुषमा स्वराजांनी मांडली बाजू

सुषमा स्वराज या RIC च्या बैठकीत सामील होण्यासाठी चीनमध्ये गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गोची करण्याच्या दृष्टीने स्वराज यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 12:07 PM IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी, चीनमध्ये सुषमा स्वराजांनी मांडली बाजू

बिजिंग, 27 फेब्रुवारी : 'दहशतवाद्यांबाबत पाकिस्तान कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आम्हाला हल्ला करावा लागला,' असं म्हणत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भूमिका मांडली आहे. सुषमा स्वराज यांनी या मुद्द्यावरून चीनच्या परराष्ट्र सचिवांसोबत चर्चा केली आहे.

सुषमा स्वराज या RIC च्या बैठकीत सामील होण्यासाठी चीनमध्ये गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गोची करण्याच्या दृष्टीने स्वराज यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 'जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या जवानांवर मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानातून चालणाऱ्या जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा सहभाग होता,' अशी स्पष्ट भूमिका सुषमा स्वराजांनी चीनमध्ये मांडली.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे.

Loading...

त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.


SPECIAL REPORT : Air Strike ची इनसाइड स्टोरी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...