भारताकडून दहशतवाद्यांचा खात्मा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली पहिली प्रतिक्रिया

'आपला चांगुलपणा ही आपली कमजोरी समजू नये. भारतीय वायूसेनेला माझा सलाम, जय हिंद!'

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 11:58 AM IST

भारताकडून दहशतवाद्यांचा खात्मा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर आता देशभरातून अनेकांची प्रतिक्रिया समोर येत आहेत. 'आपला चांगुलपणा ही आपली कमजोरी समजू नये. भारतीय वायूसेनेला माझा सलाम, जय हिंद!' असं म्हणत सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून असा केला हल्ला; AIRSTRIKE चा पहिला VIDEOभारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला आहे. भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...