काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, 2 वैमानिकांसह 7 जणांचा मृत्यू

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 05:36 PM IST

काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, 2 वैमानिकांसह 7 जणांचा मृत्यू

श्रीनगर, 27 फेब्रुवारी : भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे.

त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

Loading...


पाकच्या कुरापती सुरूच; शोपियानमध्ये सुरू असलेल्या गोळीबारीचा पहिला VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 11:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...