IndiaStrikesBack : हा सर्जिकल स्ट्राइक गेल्या वेळेपेक्षा जास्त शक्तिशाली, जाणून घ्या कारणं

IndiaStrikesBack : हा सर्जिकल स्ट्राइक गेल्या वेळेपेक्षा जास्त शक्तिशाली, जाणून घ्या कारणं

उरी हल्ल्यानंतर सप्टेंबर 2016मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकपेक्षा हा सर्जिकल स्ट्राइक जास्त जोरदार आणि मोठा आहे. याची कारणं अशी आहेत.

  • Share this:

बालाकोट, 26 फेब्रुवारी : पहिल्यांदा 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केलाय. अगदी 1999च्या कारगील युद्धाच्या वेळीही भारतीय लढाऊ विमानं सीमेच्या पलिकडे गेले नव्हते. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात आरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 12 दिवसांनंतर भारतानं बदला घेतला. बालाकोट आणि पीओकेच्या दोन इतर ठिकाणं, मुजफ्फराबाद आणि चिकोटी इथे हल्ला केला.

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. उरी हल्ल्यानंतर सप्टेंबर 2016मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकपेक्षा हा सर्जिकल स्ट्राइक जास्त जोरदार आणि मोठा आहे. याची कारणं अशी आहेत.

1. पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक झाला तो 29 सप्टेंबरला. उरीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 11 दिवसांनंतर हा सर्जिकल स्ट्राइक केला होता. उरी हल्ल्यात 11 जवान शहीद झाले होते. त्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राइक LOCच्या जवळ कुपवाडा आणि पुंछहून काही अंतरावर झाला होता.

मंगळवारी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये फक्त मुजफ्फराबाद आणि चिकोटी याच ठिकाणांवर नाही तर पाकिस्तानच्या बरंच आत जाऊन बालाकोटवरही हल्ला केलाय.

जगभरातले देश कुठल्याही देशाची सीमा ओलांडण्याआधी खूप काळजी घेतात. कारण असं करणं ही युद्धाला तोंड फोडण्याचं लक्षण मानलं जातं.

2. या हल्ल्यात जे बाँब वापरलेत ते पहिल्या सर्जिकल स्ट्राइकपेक्षा जास्त प्रभावी आणि खतरनाक होते.

सूत्रांच्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळजवळ 1000 किलो लेझर गायडेड बाॅम्ब जैशचं नियंत्रण असलेल्या ठिकाणांवर टाकले. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 300हून जास्त दहशतवादी मारले गेलेत.

3. पाकिस्ताननं खूप खबरदारी घेतल्यानंतरही हा सर्जिकल स्ट्राइक झाला. पाकिस्तानच्या वायुसेनेचे मुख्य मुजाहिद अनवर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानाचं वायुदल सक्षम आहे, असं सांगितलं होतं. पण आज भारतानं त्याचं सामर्थ्य सिद्ध केलं.

IndiaStrikesBack : ... म्हणून भारताला घाबरतो पाकिस्तान, या 10 शस्त्रांसमोर निभाव लागणं अशक्य

First published: February 26, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading