एअर स्ट्राइकसाठी अशी वापरली रणनीती

एअर स्ट्राइकसाठी अशी वापरली रणनीती

एअर स्ट्राइक करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे फार तयारी करावी लागत नाही. एअर स्ट्राइक करण्यासाठी फक्त दोन ते तीन फायटर एअरक्राफ्टचीच गरज असते.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : एअर स्ट्राइक करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे फार तयारी करावी लागत नाही. एअर स्ट्राइक करण्यासाठी फक्त दोन ते तीन फायटर एअरक्राफ्टचीच गरज असते. यात एका एअर क्राफ्टला लक्ष्य दिलं जातं. ते एअर क्राफ्ट मिशन पूर्ण करतं. ही माहिती दिली ग्रुप कॅप्टन निवृत्त तरुण कुमार सिंगा यांनी. न्यूज 18 हिंदीशी बातचीत करताना एअर स्ट्राइक कसं होतं ते सांगत होते.

तरुण कुमार सिंगा यांनी सांगितलं, ज्या भागात एअर स्ट्राइक करायचाय त्याचा नकाशा नीट पाहिला जातो. या ठिकाणाच्या आजूबाजूला शत्रूची ठिकाणं कोणकोणती आहेत, त्याचं निरीक्षण केलं जातं. त्या ठिकाणी आपली विमानं एअर क्राफ्ट आॅपरेशन करणार असतील, तर ती परत कशी येऊ शकतात, हेही पाहिलं जातं.

आपण सीमारेषेच्या पलीकडे जात तर नाही ना, हेही पाहिलं जातं. हा सर्व रणनीतीचाच एक भाग असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, जो पायलट हे काम करणार आहे, त्याला हवेत सुरक्षा दिली जाते. त्याला कमीत कमी दोन फायटर एअर क्राफ्ट सुरक्षा देतात. ही दोन लढाऊ विमानं  शत्रूचं कुठलं विमान येत तर नाही ना, हे बघतात.

जर शत्रूचं लढाऊ विमान येत असेल तर सुरक्षा देणारे पायलट त्याचा सामना करतात. एअर स्ट्राइक करणारा पायलट कसलीच पर्वा न करता आपलं काम पूर्ण करतो. त्याला आजूबाजूला बघायची गरज लागत नाही.

दहशतवाद्यांचा खात्मा, 'जेम्स बॉण्ड'चं प्लॅनिंग आणि भारतीय सेनेनं घेतला बदला

First published: February 26, 2019, 12:00 PM IST

ताज्या बातम्या