जगभरात आज बुद्ध पौर्णिमेचा उत्साह

जगभरात  आज बुद्ध पौर्णिमेचा उत्साह

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जगातील अनेक देशात प्रार्थनांचं आयोजन केलं जातं.

  • Share this:

30 एप्रिल: आज बुद्ध पौर्णिमा. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जगातील अनेक देशात प्रार्थनांचं आयोजन केलं जातं.

श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबिरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. सारनाथमध्ये आज सकाळपासूनच बौद्ध धर्मीयांनी गर्दी केली असून इथे बुद्ध पौर्णिमेचा उत्साह दिसतो आहे.

वन विभाग व वन्य जीव विभागाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना केली जाते. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात ही गणना होते. बुद्ध पौर्णिमाला संध्याकाळपासून हे अभियान सुरू करण्यात येतं. प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते. दरम्यान बुद्ध पौर्णिमेचे निमित्त साधून उनाच्या दलितांनीही धम्माची दीक्षा घेतली आहे.

तर पंतप्रधान मोदीसुद्धा आज  बुद्ध जयंती निमित्त आयोजित एका उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

First published: April 30, 2018, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading