महाआघाडीचा खेळ खल्लास? कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी युती नाही - मायावती

महाआघाडीचा खेळ खल्लास? कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी युती नाही - मायावती

'सोनिया आणि राहुल गांधी यांना बसपासोबत जावं असं वाटतंय मात्र दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेते त्यात आडकाठी आणत आहेत'

  • Share this:

लखनऊ,ता. 3 ऑक्टोबर : काँग्रेसने कायम धोका दिला आहे, ते आघाडी करण्याबाबत गंभीर नाहीत असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेस सोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा बुधवारी केली. सोनिया आणि राहुल गांधी यांना बसपासोबत जावं असं वाटतंय मात्र दिग्विजय सिंग यांच्यासारखे नेते त्यात आडकाठी आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मायावतींच्या या घोषणेमुळे सर्वात मोठा फायदा भाजपला होणार आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तरप्रदेशात भाजप विरूद्ध सर्व पक्ष एकत्र येतील ही शक्यता आता मावळल्यातच जमा आहे.

मायावती यांनी लखनऊत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सोबत जाणार नसल्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या बसपाने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर काँग्रेसला नेहमीच मदत केलीय. पण प्रत्येक वेळी काँग्रेसने पाठित खंजीर खुपसला. आघाडी करण्याबाबत काँग्रेस मुळीच गंभीर नाही.

दिग्विजय सिंग हे संघाचे एजंट आहेत असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळेच बसपाने दक्षिणेत जनतादल धर्मनिरपेक्ष आणि हरियाणात इंडियन लोक दल आणि छत्तीसगढ मध्ये अजित जोगी यांच्या पक्षासोबत युती केली.

काँग्रेसपक्ष अहंकारी असून त्यांनी इतर पक्षांना कायम दुय्यम स्थान दिलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता काँग्रेसला धडा शिकवेल. बसपा हा कार्यकर्त्यांच्या घामातून तयार झालेला पक्ष आहे. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाने चालणारा असल्याने बसपाचा वापर कुणीही करू शकणार नाही. काँग्रेस आज मुस्लिमांना तिकीट द्यायला घाबरते मात्र बसपा तसं कधीच करणार नाही.

कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभातला हा आठ महिन्यांपूर्वीचा फोटो आहे. या समारंभात बसपाच्या नेत्या मायावती आणि सोनिया गांधींशी अशी जवळीक दिसून आली. राहुल गांधीही या सर्व क्षणांचे साक्षीदार होते. मात्र आठ महिन्यांमध्येच ही परिस्थिती बदलली.

कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभातला हा आठ महिन्यांपूर्वीचा फोटो आहे. या समारंभात बसपाच्या नेत्या मायावती आणि सोनिया गांधींशी अशी जवळीक दिसून आली. राहुल गांधीही या सर्व क्षणांचे साक्षीदार होते. मात्र आठ महिन्यांमध्येच ही परिस्थिती बदलली.

काँग्रेस स्वत:मध्ये काहीही सुधारणा करू इच्छित नाही. काँग्रेसनेच मला ताज कॉरिडॉर प्रकरणात फसवलं. बसपाला संपवण्याचं काँग्रेसचं षडयंत्र असून त्यात भाजपही सामील आहे. दिग्विजय सिंग यांनी मायावतींच्या आरोपांना उत्तर दिलं. मायावतींचा आपण कायम आदर करत आलोय. आगामी निवडणुकीत बसपाशी आघाडी करावी हे माझंही मत होतं. मात्र मायावतींनी हा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रीया दिग्विजय सिंग यांनी दिलीय.

जून महिन्यात उत्तर प्रदेशात कैराना लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक झाली होती. त्यात भाजप विरोधात काँग्रेस,सप,बसपा असे सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यामुळं भाजपचं वर्चस्व असलेल्या या भागात राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांचा विजय झाला होता.

या विजयानंतर सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपचा पराभव करण्याचा निश्चय केला होता. देशभर या विजयाची चर्चा झाली. भाजपचा पराभव होऊ शकत नाही हे समिकरण मोडलं गेलं असंही म्हटलं गेलं. लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत कैराना पॅटर्न राबवला तर भाजपला ही निवडणूक जड जाणार असंही म्हटलं जात होतं.

कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या शपथविधी कार्यक्रमात झाडून सर्व विरोधीपक्ष नेते एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा झाली ती सोनिया गांधी आणि मायावतींच्या जवळीकीची. मात्र परस्परांवर अविश्वास, अहंकार आणि सत्तेची भूक यामुळं विरोधी पक्ष एकत्र येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. याचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होण्याची शक्यता आहे.

EXCLUSIVE VIDEO: बापूंचा स्वावलंबनाचा धडा सोनिया गांधींनी गिरवला

 

 

First published: October 3, 2018, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading