लंडनमध्ये MBA झालेला हा तरुण असेल मायावतींचा वारसदार?

लंडनमध्ये MBA झालेला हा तरुण असेल मायावतींचा वारसदार?

'जातीयवादी माध्यमं आणि काही लोकांना काय वाटतं याचा मी कधीच विचार करत नाही.'

  • Share this:

लखनऊ 17 जानेवारी : बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या कामाची तऱ्हाच काही निराळी आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये मायावतींच्या सतत सोबत असणाऱ्या तरुणाविषयी बातम्या येत होत्या.  तो तरुण कोण आहे? नेमका काय करतो? बसपातलं त्याचं स्थान काय? असे अनेक विषय चर्चिले जात होते. या बातम्यांनी वैतागलेल्या मायावतींनी आज त्या तरुणाविषयी खुलासा केला आणि स्पष्टीकरण दिलं. कुणाला काय वाटतं याची मी फिकीर करत नाही असंही त्या म्हणाल्या.

बसपाच्या सर्व मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या त्या तरुणाविषयी फक्त बसपामध्येच नाही तर सर्वच पक्षात आणि माध्यमांमध्येही उत्सुकता होती. त्याचा आता खुलासा झालाय. तो तरुण आहे मायावतींचा भाचा आकाश आनंद. मायावतींचा भाऊ आनंद यांचा तो मुलगा आहे.

लंडनमध्ये MBA झालेला आनंद आता भारतात परतला असून आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत असतानात राजकारणातही सक्रीय झालाय. आणि राजकारणाचे धडेही गिरवतोय. आणि त्याच्या गुरु आहेत खुद्द मायावती. मायावती म्हणाल्या, " आकाशला मी बसपाशी जोडलं आहे. बसपा ही चळवळ आहे.

त्याला शिकण्याची संधी दिली माहिजे. यामुळे जातीयवादी माध्यमं आणि काही लोकांना काय वाटतं याचा मी कधीच विचार करत नाही." मी कांशीरामजींची शिष्या आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याची कला मला माहित आहे असा इशाराही त्यांनी दिला.

या आधी मायावतींचे भाऊ आनंद हे बसपाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर मायावतींनी त्यांना सर्व पदावरुन दूर केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबातला कुठलाही सदस्य बसपात पदावर नव्हता.

आता आकाश सक्रीय झाल्याने मायावतींवर पुन्हा घराणेशाहीचा आरोप होतोय. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. मी कधीच घराणेशाही केली नाही. टीका करणाऱ्यांनी करत राहावी असं सांगत त्यांनी आकाशच्या राजकारणातल्या पदापर्णाचं स्वागत केलं.

मायावतींचा वाढदिवस, महत्त्वाच्या पत्रकार परिषदा, बैठका अशा सगळ्या ठिकाणी आकाशची उपस्थिती असते. त्यामुळे त्याला मायावती आपला उत्तराधिकारी म्हणून घडवत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

VIDEO : ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही व्हाल थक्क

First published: January 17, 2019, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading