मायावतींचा whatsapp नंबर सोशल मीडियावर व्हायरल

मायावतींचा whatsapp नंबर सोशल मीडियावर व्हायरल

बहुजन समाज पक्ष अन्य राजकीय पक्षांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय नाही. पण सोशल मीडियावरील मेसेज सध्या त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

  • Share this:

लखनऊ, 28 जानेवारी: बहुजन समाज पक्ष अन्य राजकीय पक्षांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय नाही. पण सोशल मीडियावरील मेसेज सध्या त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी बसपाच्या लोकसभा उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या यादीची इतकी चर्चा सुरु झाली की अखेर पक्षाला स्पष्टीकरण द्यावे लागले. या प्रकरणावर पडदा पडतो की नाही तोपर्यंत आता पक्षाच्या प्रमुख मायावती यांचा whatsapp नंबर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतक नव्हे तर बसपा युवा मोर्चा सुरु करणार असल्याचे मेसेज येत आहेत.

सोशल मीडियावर जो नंबर व्हायरल केला जात आहे तो मायावती यांचा नसल्याचे पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रमुख आर.एस.कुशवाहा यांनी सांगितले. तसेच युवा मोर्चाच्या संघटनेचे वृत्त देखील चुकीचे असल्याचे कुशवाहा यांनी स्पष्ट केले. पक्षाची युवा मोर्चा किंवा छात्र मोर्चा वा महिला मोर्चा अशी कोणतीही संघटना नाही.

राज्यात समाजवादी पक्षा सोबत झालेल्या आघाडीनंतर अशा प्रकारची अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर जो पत्र व्हायरल केले जात आहे ते आणि त्यावरील स्वाक्षरी खोटी असल्याचे कुशवाहा यांनी सांगितले.

याआधी मायावती यांच्या स्वाक्षरी असलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात लोकसभा उमेदवारांची नावे देण्यात आली होती. या प्रकरणी पक्षाचे नेते गौतम पल्ली यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. तर पक्षाने अशी कोणतीही यादी जाहीर केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

Special Report: पालघरमध्ये भाजप श्रीनिवास वनगा यांच्या संपर्कात?

First published: January 28, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading