BSP नेत्याच्या तोंडाला काळं फासून काढली गाढवावरून धिंड, VIDEO VIRAL

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकाच्या तोंडाला काळं फासून गाढवावरुन ढिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 02:34 PM IST

BSP नेत्याच्या तोंडाला काळं फासून काढली गाढवावरून धिंड, VIDEO VIRAL

जयपूर, 22 ऑक्टोबर: बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकाच्या तोंडाला काळं फासून गाढवावरुन ढिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. समन्वयकाच्या तोंडाला काळं फासून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला. त्यानंतर त्यांना जबरदस्ती गाढवावर बसून त्यांची ढिंड काढण्यात आली.

हा प्रकार जयपूरच्या बहुजन समाज पक्षाच्या कार्यालयासमोर घडला आहे.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये मंगळवारी सकाळी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय समन्वयकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातून जयपुरात आलेल्या समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांनी हे गैरवर्तन केलं. तिकीट विकणे आणि पक्षातील कार्यकर्त्यांना धोका दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी समन्वयकासह दोन पदाधिकाऱ्यांवर लावला आहे. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी म्हणणं ऐकून न घेताच त्यांना घेरलं आणि तोंडाला काळ फासून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समन्वयकाला जबरदस्ती गाढवावर बसवून गावात फिरवलं आहे. याआधी बहुजन समाज पक्षाच्या 6 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे बाकी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती. त्यामध्ये भर पडली ती कार्यकर्त्यांसोबत केलेल्या धोकेबाजीची. त्यामुळे कार्यकर्ते अधिक चिडले आणि हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...