नवनिर्वाचित खासदारावर बलात्काराचा आरोप, संसदेच्या आधी चढावी लागणार तुरुंगाची पायरी?

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चारच दिवस झाले आहेत. नवनिर्वाचित खासदारांना अनेक जण शुभेच्छा देत आहेत. अशातच एका नवनिर्वाचित खासदाराला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 01:58 PM IST

नवनिर्वाचित खासदारावर बलात्काराचा आरोप, संसदेच्या आधी चढावी लागणार तुरुंगाची पायरी?

नवी दिल्ली, 27 मे: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चारच दिवस झाले आहेत. नवनिर्वाचित खासदारांना अनेक जण शुभेच्छा देत आहेत. अशातच एका नवनिर्वाचित खासदाराला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लागवली आहे. यामुळे या खासदाराला संसदेच्या ऐवजी प्रथम तुरुंगाची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमधील घोसी लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले बसपाचे खासदार अतुल राय यांच्यावर एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा आहे. संबंधित पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतुल राय फरार आहेत.

राय यांनी न्यायालयाकडे 23 मे पर्यंत दिलासा देण्याची विनंती केली होती. पण न्यायालयाने ती अमान्य केली. न्या.इंदिरा बॅनर्जी आणि न्या.संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हे प्रकरण रद्द करण्यासारखे नाही. तुम्ही निवडणूक देखील लढवली आहे आणि तुमच्यावर खटला देखील सुरु आहे. राय यांची याचिका रद्द केली असून याप्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

पत्नीची भेट करुन देते असे सांगत अतुल राय यांनी पीडित तरुणीला घरी बोलवले होते. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता. यासंदर्भात राय यांनी तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. दरम्यान, अतुल राय यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित तरुणी निवडणूक लढवण्यासाठी कार्यालयात निधी मागण्यासाठी येत असे. तसेच निवडणुकीच्या काळात ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एक लाख मतांनी झाला होता विजय

Loading...

घोसी मतदारसंघातून सपा-बसपाने फरार उमेदवार अतुल राय यांना उमेदवारी दिली होती. राय यांनी भाजपच्या हरिनारायण यांचा 1 लाख 22 हजार मतांनी पराभव केला. राय यांच्यावर एका कॉलेजमधील तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. प्रथम उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारा दरम्यान ते मतदारसंघात उपस्थित नव्हते. राय यांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले होते. या संपूर्णात फरार झालेल्या राय यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे आहे. देशातील सर्व विमानतळावर अलर्ट देण्यात आला आहे.

मायावतींनी केला होता बचाव

अतुल राय यांचा बचाव करण्यासाठी बसपा प्रमुख मायावती मैदानात उतरल्या होत्या. बसपाचा उमेदवार बदनाम करण्यासाठी भाजपने प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रचारा दरम्यान पोलिसांनी अनेक वेळा राय यांच्या घरावर छापे टाकले होते. निवडणुकीच्या प्रचारात पक्षाने त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे मतदारांना सांगितले होते. निकालानंतर ते स्वत: आरोप खोटे असल्याचे सिद्ध करतील असा प्रचार देखील करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bsp
First Published: May 27, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...