मध्य प्रदेशमध्ये होणार राजकीय भूकंप?; मायावतींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस सरकारसाठी धोक्याची घंटा

मध्य प्रदेशमध्ये होणार राजकीय भूकंप?; मायावतींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस सरकारसाठी धोक्याची घंटा

भाजपचा पराभव करून सत्तेत आलेल्या काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

  • Share this:

भोपाळ, 04 फेब्रुवारी: मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार स्थापन होऊन केवळ दोन महिने झाले आहेत. भाजपचा पराभव करून सत्तेत आलेल्या काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बसपाच्या आमदाराने मंत्रीपद देण्यावरून सरकारला इशारा दिला होता. आता खुद्द बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी असा काही हल्लाबोल चढवला आहे की काँग्रेस सरकार टिकेल की नाही याबद्दल शंका वाटू लागली आहे.

संबंधित बातमी: Video:"मी मंत्र्यांची बाप, सरकार देखील मीच स्थापन केलं"

मायावती यांनी रविवारी राज्य सरकारवर तोफ डागली. कमलनाथ सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. राज्यातील भाजप सरकार जाण्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण यानंतर सत्तेत आलेले सरकार देखील लोकांचे शोषण करत आहे. मायावती यांच्या या टीकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी दबाव निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्न करणाऱ्या मोठा धक्का बसला आहे. अर्थात बसपाकडून काँग्रेस सरकारला धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही.

बसपाच्या पथरियाच्या आमदार रमाबाई अहिरवार यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेस सरकारला दोन वेळा धमकी वजा इशारा दिला होता. मला जर धमकी दिली नाही तर राज्यात कर्नाटकासारखी परिस्थीत निर्माण होईल.

राज्यात नोव्हेंबर 2018मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 114 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला दोन जागांची आवश्यकता होती. तेव्हा बसपाच्या दोन, समजावादी पक्षाच्या 1 आणि 4 अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

विशेष म्हणजे मायावती यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर राज्यातील काँग्रेस आघाडीचे बहुमत 121 वर पोहोचले होते. राज्यात 15 वर्षानंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. पण बसपाकडून दिल्या जाणाऱ्या धमकीमुळे राज्यातील काँग्रेसची अवस्था कर्नाटकसारखी तर होणार नाही ना अशी शक्यता वाटू लागली आहे.

VIDEO : 'एअर इंडिया'ने प्रवाशांना जेवणात दिलं चक्क झुरळ

First published: February 4, 2019, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading