BSNL, MTNL बंद होणार? काय आहे सरकारचा प्लॅन

BSNL, MTNL बंद होणार? काय आहे सरकारचा प्लॅन

BSNL, MTNLतोट्यात असून त्यांवर आता सरकार गांभीर्यानं विचार करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून : दूरसंचार क्षेत्रात सेवा देणाऱ्या सरकारी कंपन्या BSNL आणि MTNL सध्या तोट्यात आहेत. त्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून कर्मचाऱ्यांना पगार देणं देखील कठीण होऊन बसलं आहे. दरम्यान, या सरकारी कंपन्या बंद करण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा आरोप केला जात आहे. पण, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मात्र BSNL, MTNL करण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचं म्हटलं आहे. या दोन्ही कंपन्यांना नवी उभारी देण्याकरता सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. त्यासाठी व्यापक गोष्टींचा सरकार विचार करत असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली. इंडियन इन्ट्युट्यून ऑफ मॅनेजमेंट ही BSNL आणि MTNLला उभारी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. तोट्यात असणाऱ्या या कंपन्यांनी Department Of Telecomशी संपर्क साधला आहे.

मुख्यमंत्र्यांचा दणका; 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास पगार कापणार!

स्पर्धा वाढली

सध्या दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Idea, Vodafone, Airtel, Jioया कंपन्या बाजारात आहेत. त्याचा परिणाम हा BSNL, MTNLच्या फायद्यावर होत असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. सद्यस्थितीमध्ये BSNL काही महत्त्वपूर्ण सेवा पूरवत असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातील सेवा, अंदमान, निकोबार बेटांवर सेवा तसंच Optical Fibreवर आधारित सेवा देखील BSNL पुरवत असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली.

राज्यात या दिवसांमध्ये होणार मुसळधार पाऊस

पगार देण्यास उशीर

BSNL, MTNLच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यास देखील उशीर झाला आहे. खर्च आणि कमाईचा ताळमेळ बसवणे कठिण झाल्यामुळे पगार देण्यास उशीर झाल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

31 मार्च 2019पर्यंत BSNLमध्ये 1,63, 902 कर्मचारी करत होते. तर, MTNLमधील कर्मचाऱ्यांची संख्या ही 21, 679 होती.

VIDEO: चंद्रकांत पाटलांवरून अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BSNL
First Published: Jun 27, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या