खळबळजनक! गुजरात सीमेजवळ सापडल्या पाकिस्तानी नौका; निवडणुकीपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा धोका?

खळबळजनक! गुजरात सीमेजवळ सापडल्या पाकिस्तानी नौका; निवडणुकीपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा धोका?

सीमा सुरक्षा दलाने (BSF) गुजरात सीमेजवळ 5 पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. याअगोदरच गुप्तचर विभागाने सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली आहे. आता गुजरातमध्ये या नौका सापडल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : सीमा सुरक्षा दलाने (BSF) गुजरात सीमेजवळ 5 पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. याअगोदरच गुप्तचर विभागाने सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली आहे. आता गुजरातमध्ये या नौका सापडल्याने खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीर सीमेवर भारतीय जवानांची कडक नजर आहेच. शिवाय देशाच्या इतर सीमांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नेहमीच्या गस्तीच्या वेळी BSF ला या नौका दिसल्या. मच्छिमारीसाठी वापरतात तशा या नौका आहेत. अजूनपर्यंत या नौकांमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही. पण या भागाची कसून तपासणी सुरू आहे.

गुजरातमध्ये भारत- पाक सीमेजवळ असणाऱ्या हरामी नाला क्रीक परिसरातून या नौका जप्त करण्यात आल्या आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सागरी मार्गाने दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्यानंतर सर्व सागरी सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली. मच्छिमारांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

हे वाचा -तिरंग्याची शान वाढली, भारत जगातील टॉप टेन 'ब्रँड व्हॅल्यू' असलेल्या देशांमध्ये

तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत काही संशयितांची धरपकडही करण्यात आली. गुजरातच्या नाला क्रीकजवळ अशा सोडून दिलेल्या नौका मिळण्याचं प्रमाण मात्र वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अशा सोडून दिलेल्या नौका मिळाल्या होत्या.

त्या कुठून आल्या याविषयी स्थानिकांना समाधानकारक उत्तरं देता आली नव्हती. आता पुन्हा एकदा याच परिसरात पाकिस्तानी नौका सापडल्या आहेत. हरामी नाला परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास या नौका सापडल्याचं BSF च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

------------------------------------------------------------------

अन्य बातम्या

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले

...म्हणून राहुल गांधी प्रचारासाठी येत नाहीत, अजित पवारांनी केला खुलासा

1,300 वर्षांपासून एकाच जागी आहे 'कृष्णा बटर बॉल', जाणून घ्या रहस्य

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 12, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading