सुट्टीवर आलेल्या एका काश्मिरी जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

सुट्टीवर आलेल्या एका काश्मिरी जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

जम्मू-कश्मीरच्या बांदिपूरमध्ये बीएसएफच्या जवानाची रमझान अहमदची दहशतवाद्यांनी त्याच्या इथल्या घरात घुसून हत्या केली. लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही हत्या केली. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबावरही गोळ्या झाडण्यात आल्या.

  • Share this:

28 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरच्या बांदिपूरमध्ये बीएसएफच्या जवानाची रमझान अहमदची दहशतवाद्यांनी त्याच्या  इथल्या घरात घुसून  हत्या केली. लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही हत्या केली. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबावरही गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार 33वर्षांचा रमझान सुट्टीवर घरी आला होता. 3 ते 4 दहशतवादी त्याच्या घरात घुसले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात रमझानचं कुटुंबही जखमी झालंय. रमझान 73 बटालियनमध्ये काँस्टेबल पदावर होता.

जम्मू काश्मिरमधल्या हाजिन इथे त्याच्यावरअंत्यसंस्कार होणार आहेत. हा सूड घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचा जम्मू काश्मिर पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

First published: September 28, 2017, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading