गुप्त माहिती पाकिस्तानला देण्याप्रकरणी महाराष्ट्रातील जवान अटकेत

गुप्त माहिती पाकिस्तानला देण्याप्रकरणी महाराष्ट्रातील जवान अटकेत

सीमेवरील कुंपन, रस्त्यांचे फुटेज, युनिटमधील अधिकाऱ्यांचे फोन नंबर फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानला पाठवले जात असल्याचा आरोप या अटक करण्यात आलेल्या जवानावर करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 नोव्हेंबर : पाकिस्तान  इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या मिर्झा फैजल याला भारताबाबतची गोपनीय माहिती देण्याच्या आरोपखाली एका बीएसएफ जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख रियाजुद्दीन असं अटक करण्यात आलेल्या जवानाचं नाव असून तो मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे.

सीमेवरील कुंपन, रस्त्यांचे फुटेज, युनिटमधील अधिकाऱ्यांचे फोन नंबर फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानला पाठवले जात असल्याचा आरोप या अटक करण्यात आलेल्या जवानावर करण्यात आला आहे.

शेख रियाजुद्दीन हा बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) मध्ये काम करत होता. त्यांचं मूळ गाव लातूर जिल्ह्यातील रेनपुरा हे आहे. हेरगिरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्यानंतर लातुरात एकच खळबळ उडाली.

Loading...

शेख रियाजुद्दीन याच्यावर पंजाब पोलिसांनी हेरगिरीप्रकरणी  ही अटकेची कारवाई केली आहे. या जवानाकडून दोन मोबाईल आणि सात सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. बीएसएफ 29 या बटालियनच्या डिप्टी कमांडंट ममदोत यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर फिरोजपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

 VIDEO : नाशिकमध्ये धक्कादायक अपघात, भल्या मोठ्या ट्रकची थेट टॅक्सीला धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...