गुजरातपासून पंजाब बॉर्डरपर्यंत पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न उधळला!

गुजरातपासून पंजाब बॉर्डरपर्यंत पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न उधळला!

दोन दिवसांपूर्वीच पंजाबच्या (Punjab) बॉर्डवरुन भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा कट BSF च्या जवानांनी उधळून लावला होता. त्यापाठोपाठ आता गुजरातच्या (Gujrat ) बॉर्डरवरुन घुसखोरीचा एक प्रयत्न भारतीय सुरक्षा दलानं उधळला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : भारत–पाकिस्तान बॉर्डरवर ( India – Pakistan Border) अशांतता माजवण्याच्या पाकिस्तानच्या कुरापती या सतत सुरुच आहेत. दोन दिवसांपूर्वीच पंजाबच्या (Punjab) बॉर्डवरुन भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा कट BSF च्या जवानांनी उधळून लावला होता. त्यापाठोपाठ आता गुजरातच्या (Gujrat ) बॉर्डरवरुन घुसखोरीचा एक प्रयत्न भारतीय सुरक्षा दलानं उधळला आहे.

काय घडला प्रकार?

भारत-पाकिस्तान यांची मोठी सीमा गुजरात राज्याला लागून आहे. गुजरातमधील कच्छ बॉर्डरवरुन घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. कोटेश्वर कडाला क्रीक भागात या नागरिकाला पकडण्यात आले आहे. त्याची बोट देखील सुरक्षा दलानं ताब्यात घेतली आहे. हा पाकिस्तानी नागरिक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पेट्रोलिंगला असणाऱ्या BSF जवांनाच्या सतर्कतेमुळे त्याला अटक झाली आहे. ही व्यक्ती मासेमार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र सुरक्षा दलाकडून याची सर्व बाजूने चौकशी करण्यात येत आहे.

पंजाबमध्ये उधळला होता प्रयत्न

भारत-पाकिस्तान यांच्यातील पंजाब बॉर्डवर दोन दिवसांपूर्वीच BSF च्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. अटारी बॉर्डरवरुन हे दहशतवादी भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये ड्रोननं टेहाळणी

जम्मू काश्मीरमधील पूरा सेक्टरमध्ये मागील आठवड्यात पाकिस्तानकडून ड्रोननं टेहाळणीचा प्रकार उघड झाला होता. BSF च्या जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार करताच ते ड्रोन तो हल्ला चुकवत पाकिस्तानमध्ये माघारी परतले होते. भारताच्या बॉर्डरवर सर्वच ठिकाणी पाकिस्तानकडून अशांततेचे प्रयत्न सुरु असल्याने भारतीय लष्कर तसेच BSF ला अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 12:01 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या