'या' बीएस 3 वाहनांवर बंदी नाही, सुप्रीम कोर्टाचा खुलासा

'या' बीएस 3 वाहनांवर बंदी नाही, सुप्रीम कोर्टाचा खुलासा

जी वाहनं शेती आणि बांधकामाच्या कामांसाठी वापरली जातात त्या वाहनांवर बंदी नाही

  • Share this:

08 मे : बीएस 3 वाहनांवर बंदीनंतर सुप्रीम कोर्टाने वाहन उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा दिलाय. शेती आणि बांधकाम क्षेत्राला लागण्याऱ्या वाहनांवर बंदी नसणार असं कोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे ही वाहनं खरेदी आणि विक्री करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

सुप्रीम कोर्टाचा बीएस 3 च्या वाहनांबाबत नवा निर्णय जाहीर केलाय. जी वाहनं शेती आणि बांधकामाच्या कामांसाठी वापरली जातात त्या वाहनांवर बंदी नाहीय. म्हणजे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी, क्रेन यासारख्या वाहनांवर आता बंदी नसणार आहे.

त्यांची विक्री आणि रजिस्ट्रेशन होऊ शकतं. यामुळे जेसीबी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा, अशोक लेलँड या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

29 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने बीएस 3 वाहनांवर बंदी आणली होती. यामुळे लाखो गाड्यांवर गोडाऊनमध्ये पडून राहण्याची वेळ आली.या निर्णयानंतर शेतीसाठी वाहनं बनवणाऱ्या कंपन्या सुप्रीम कोर्टात गेल्या, आणि निर्णयावर स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. त्यावर आज कोर्टाने हा निर्णय दिला.

First published: May 8, 2017, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading