सुन्न करणारी बातमी! बहिणीची वरात निघण्याऐवजी घरातून निघाली भावाची अंत्ययात्रा

सुन्न करणारी बातमी! बहिणीची वरात निघण्याऐवजी घरातून निघाली भावाची अंत्ययात्रा

Coronavirus च्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात साधेपणाने विवाह सोहळा करायचं ठरलं होतं. लग्नघर हसत-नाचत असतानाच अचानक गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि सगळा माहौल पालटला.

  • Share this:

कासगंज (उत्तर प्रदेश), 13 मे : लॉकडाऊन असूनही बहिणीच्या लग्नाची लगबग त्यांच्या घरी सुरू होती. Coronavirus च्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात साधेपणाने विवाह सोहळा करायचं ठरलं होतं. लग्नघर हसत-नाचत असतानाच अचानक गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि सगळा माहौल पालटला. ज्या घरातून बहिणीची बिदाई करायची त्याच घरातून भावाची अंत्ययात्रा काढावी लागली.

ही घटना घडली उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये. सिकंदरपूर नावाच्या गावात श्रीपाल यांच्या दोन मुलींची लग्न या मे महिन्यात होणार होती. धूमधडाक्यात लग्न करण्याचा बेत होता. पण कोरोनाव्हायरसमुळे विचका झाला. त्यांना धूमधडाक्यात लग्नाऐवजी साधेपणानं लग्नकार्य करायचं ठरवायला लागलं.सूरजमुखी आणि रश्मी या दोन बहिणींची लग्न एकाच मांडवात लागणार होती. 8 मेला दोन्ही वराती दारात यायच्या होत्या. पण लॉकडाऊनच्या नियमांमुळे सूरजमुखीच्या सासरची मंडळी तिला 9 तारखेलाच घेऊन गेली. तर रश्मीची बिदाई 12 तारखेला करण्याचं ठरलं.

चिमुकल्याचं मोठं दातृत्व, कपकेक विकून कमावलेले 50 हजार दिले मुंबई पोलिसांना

12 तारखेला सकाळपासूनच गजबजलेल्या लग्नघरात विधी सुरू होते. वरपक्षाकडची मोजून 5 माणसं पाहुणी आली होती. सगळं काही सुरळीत सुरू आहे, असं वाटत असतानाच घात झाला. छतावरून गोळी झाडल्याचा आवाज झाला. रश्मीचा मोठा भाऊ संतोष यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.

राज्यात Lockdown 4.0 अटळ; आरोग्यमंत्र्यांनी दिला रुग्णवाढीचा इशारा! हे आहे कारण

विवाहघरात हा प्रसंग ओढवल्याने घरातलं चित्र एकदम पालटलं. पोलीस पुढील तपासासाठी दाखल झाले. संतोषच्या आत्महत्येचं कारण अद्याप उघड झालेलं नाही. संतोषचं 6 वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्याला 3 वर्षाचा मुलगाही आहे. लग्नसोहळ्यात हे वेगळंच विघ्न आलेलं बघून संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.

First published: May 13, 2020, 9:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या