बिजनौर, 14 जून: नात्यातील एका तरुणासोबत बहिणीचं प्रेमप्रकरण (Sister in love with relative) सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भावाने आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या (Brother killed sister) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी त्यांनी गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर आरोपी भावालाही बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.
संबंधित घटना उत्तर प्रदेशाच्या बिजनौर शहरातील नगीना परिसरात घडली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचं आपल्या नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. मागील काही काळापासून सुरू असलेल्या संबंधाची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला ताकीद दिली होती. तर मृत मुलीचा भाऊ तिच्यावर खूपच संतापला होता. मृत मुलीनं आपले प्रेमसंबंध तोडावेत यासाठी भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव आणला होता. पण तिनं कोणाचंही ऐकलं नाही.
यातूनचं आरोपी भाऊ आणि मृत बहिणीत दोन दिवसांपूर्वी वाद झाला. आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या भावाने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीनं भावानं गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी घरच्यांनी मृत मुलीचा मृतदेह लपवून ठेवला. तसेच गावात कोणालाही न सांगता अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. त्यासाठी कबरस्तानात कबर खोदण्यासही सुरुवात केली.
हे ही वाचा-शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपूरातील 25 वर्षीय नराधमाला अटक
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपी भावालाही अटक केली आहे. आपल्या बहिणीचं नात्यातील एका मुलासोबत प्रेमसंबंध सुरू होते. तिला अनेकदा समज देऊनही तिने प्रेमसंबंध सुरू ठेवले. त्यामुळे आपण नाईलाजाने हे पाऊल उचललं असल्याची कबुली भावाने दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Murder, Uttar pradesh