मराठी बातम्या /बातम्या /देश /राहुल गांधींनी बहीण प्रियांकाचे केले लाड, भारत जोडो यात्रेतील सर्वात क्युट Video

राहुल गांधींनी बहीण प्रियांकाचे केले लाड, भारत जोडो यात्रेतील सर्वात क्युट Video

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 दिवसांच्या ब्रेकनंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशात गेली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत प्रियांका गांधी यांनी केले.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 दिवसांच्या ब्रेकनंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशात गेली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत प्रियांका गांधी यांनी केले.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 दिवसांच्या ब्रेकनंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशात गेली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत प्रियांका गांधी यांनी केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 जानेवारी :  काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 दिवसांच्या ब्रेकनंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशात गेली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत प्रियांका गांधी यांनी केले. पदयात्रा जेव्हा दिल्लीत पोहोचली होती तेव्हा राहुल गांधी यांनी सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रा पोहोचली आहे.

राहुल गांधींसह भारत जोडो यात्रेचे उत्तर प्रदेशात स्वागत करताना प्रियांका गांधी यांनी भाषण केलं. यावेळी राहुल गांधींचे कौतुक केले. सर्व ताकद त्यांच्याविरोधात असतानाही ज्या पद्धतीने राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत त्याबद्दल अभिनंदन. भारत जोडो यात्रेत व्यासपीठावर एकत्र बसले असताना राहुल गांधी यांनी बहीण प्रियांका गांधी यांचे लाड केले. यावेळी त्यांनी प्रियांका यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांच्या गालावर अन् कपाळावर किस केलं.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात बहिण भावाच्या नात्यातले काही क्षण दिसून येतात. यात्रेवेळी सर्व नेत्यांसोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी बसले होते.

हेही वाचा : दिल्लीत तरुणीला फरफटत नेणाऱ्या 5 आरोपींमध्ये एक जण भाजपचा नेता?

देशात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच आवाज उठवला आहे. यावेळी राहुल गांधींसोबत अनेकदा प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

राहुल गांधी यांनी याआधी एकदा प्रियांका गांधी यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करताना म्हटलं होतं की, माझ्या बहिणीचं प्रेम आणि सोबत यासाठी माझ्या आयुष्यात एक खास जागा आहे. आम्ही एकमेकांचे मित्र आणि रक्षकसुद्धा आहे.

हेही वाचा : धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया

प्रियांका गांधी या राहुल गांधींना आपला बेस्ट फ्रेंड मानतात. अनेकदा त्यांनी बालपण कसं अनेक अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे साक्षीदार होते हे सांगितलं आहे. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येवेळी राहुल गांधींचे वय फक्त 14 वर्षे होतं. तर वडील राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा राहुल गांधी परदेशात शिक्षण घेत होते.

First published:

Tags: Delhi, Priyanka gandhi, Rahul gandhi, Uttar pradesh