धक्कादायक! 20 पाळीव कुत्र्यांसाठी चपात्या केल्या नाहीत, म्हणून भावाने सख्ख्या बहिणीवर झाडल्या गोळ्या

क्षुल्लक कारणावरून भावाने हे निर्घृण कृत्य केल्याचं समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेत बहिणीचा जीव गेला आहे.

क्षुल्लक कारणावरून भावाने हे निर्घृण कृत्य केल्याचं समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेत बहिणीचा जीव गेला आहे.

  • Share this:
मेरठ, 15 डिसेंबर :  भावा-बहिणींचे वाद नवीन नाहीत. पण एखाद्या क्षुल्लक कारणामुळे सुरू झालेल्या वादावादीत बहिणीवर थेट गोळ्या झाडणारा भाऊ कधी पाहिला नसेल. आपल्या पाळीव कुत्र्यांसाठी (Dogs) पोळ्या (Roti) लाटण्यास नकार दिला म्हणून एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या (brother kills sister in UP) केल्याची घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police crime) आरोपीस अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून भावाने हे निर्घृण कृत्य केल्याचं समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधील (Meerut) भवानपूर भागातील आशिष (वय 25) नामक व्यक्तीने आवड म्हणून 20 कुत्री पाळली आहेत. या कुत्र्यांसाठी दररोज चपात्या तयार करण्याबाबत त्याने बहिणीला सांगितलं होतं. घटना घडली त्यादिवशी भावाने बहिणीला या 20 कुत्र्यांसाठी चपात्या तयार करण्यास सांगितलं. परंतु बहिणीने चपात्या करण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या भावाने रागाच्या भरात गोळी झाडून बहिणीची हत्या केली. हत्येप्रकरणी आरोपी आशिष यास मेरठ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. दररोज आरोपी त्याच्या 20 पाळीव कुत्र्यांसाठी बहिणीला चपात्या बनवण्यास सांगत असे. परंतु, घटना घडली त्यादिवशी बहिणीने चपात्या बनविण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या भावाने गोळी झाडून बहिणीची हत्या केली. आरोपीचे नाव आशिष असून त्याने बहिणीच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. या कृत्यानंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं असल्याचं शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं. याबाबत मेरठ ग्रामीणचे पोलीस अधिक्षक (SP) केशव कुमार यांनी ANI ला माहिती दिली. माणसाचं प्राणीप्रेम आपण अनेकदा आपल्या आसपास बघतो. त्यातून कुत्रा पाळणं ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. परंतु अशा प्रकारे 20 कुत्री पाळणं आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या बहिणीचा खून पाडणं ही घटना धक्कादायकच म्हणता येईल. सध्या समाजात अनेक कारणांमुळे गुन्हेगारी (Crime) वाढत आहे. त्यातही क्षुल्लक कारणांवरुन एखादा गंभीर गुन्हा करण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. किरकोळ कारणावरुन आपल्या बहिणीला जीवे मारण्याच्या या प्रकारची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Published by:News18 Desk
First published: