जयपूर, 19 ऑगस्ट : काही काळापूर्वी एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले करण्याच्या विशेषत: अॅसिड टाकण्याच्या घटनांचे (Acid Attack) प्रमाण खूपच वाढले होते. त्यावर अॅसिड सहजपणे मिळण्यावर निर्बंध आल्यानं तसंच कठोर कायद्याची अंमलबजावणी होत असल्यानं अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचं चित्र असतानाच, नुकतीच जयपूरमध्ये (Jaipur) एका 15 वर्षांच्या मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला या मुलीच्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजे तिच्या भावोजींनी (Brother In Law acid attack sister in law) केला असून, तो फरार (Abscond) असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मूळ मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) सागर शहरातील असलेलं या मुलीचं कुटुंब गेल्या काही वर्षांपासून जयपूरमधील सरना डुंगर परिसरात राहत असून, या मुलीचे वडील एका कारखान्यात काम करतात. तर या मुलीची बहीण आपला पती संजय (Sanjay) याच्यासोबत कर्धनी परिसरातील चौधरी मार्केटमध्ये भाड्याने राहते. संजय मजुरी करतो.
17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 च्या सुमारास ही मुलगी घरी आली. तेव्हा ती एकटी असताना संजयही तिच्या घरात शिरला आणि तिला स्वतःबरोबर येण्यासाठी जबरदस्ती करू लागला. तिनं त्याच्यासोबत जायला नकार दिला. बरेच प्रयत्न करूनही ती आपल्याबरोबर येत नाही म्हटल्यावर त्याला राग आला आणि त्यानं खिशातून अॅसिड भरलेली बाटली बाहेर काढली आणि काही समजण्यापूर्वीच तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. यामुळे तिचा चेहरा, हात आणि पाय आणि शरीरावरील बराच भाग जळाला. तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा संजय पळून गेला.
हे वाचा - केवळ 1500 रुपयांसाठी घेतला वडिलांचा जीव, पैसे खर्च केल्याच्या रागातून फोडलं डोकं
दरम्यान शेजारी राहणारी एक मुलगी तिथं आली आणि तिनं आजूबाजूच्या लोकांना सांगितले. त्यानंतर मुलीला एसएमएस (SMS Hospital) रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तिला बर्न वॉर्डमध्ये (Burn Ward) दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच या मुलीचे पालकही घरी पोहोचले. यानंतर कर्धनी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार जयपूरमधील कर्धनी पोलीस ठाण्यात (Kardhani Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिस ठाण्याचे प्रमुख राजेश बाफना (Rajesh Bafana) या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या मुलीवर एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी या मुलीचं स्टेटमेंट घेतलं आहे.
हे वाचा - पत्नीवर उकळतं पाणी फेकत त्याने गाठला विक्रूतीचा कळस, समोर आलं संतापजनक कारण
या अॅसिड हल्ल्याचं नेमकं कारण आरोपीला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, मात्र या मुलीवर तिच्या बहिणीच्या नवऱ्याचे एकतर्फी प्रेम जडले होते. तिला त्याला आपल्यासोबत घेऊन जायचे होते पण तिनं नकार दिल्यानं त्यानं हा हल्ला केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Jaipur, Rajasthan