देशात वेगानं कमी झालीये घोडे, गाढव आणि खेचरांची संख्या, हे आहे त्यामागील गंभीर कारण

देशात वेगानं कमी झालीये घोडे, गाढव आणि खेचरांची संख्या, हे आहे त्यामागील गंभीर कारण

भारत कृषीप्रधान देश असल्यानं इथं पशूधनाचं महत्त्व खूप आहे. मात्र यात गेल्या काही वर्षात घट झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारतामध्ये पशुधन (livestock in India decreased) गेल्या काही वर्षात वेगानं कमी झालं आहे. विशेषतः घोडे, खेचर आणि गाढवांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे. (number of horses, donkeys and mules have decreased in India)

एक अभ्यास सांगतो, की 2012 साली केल्या भाजलेल्या पशुधन गणनेच्या तुलनेत या प्राण्यांची संख्या 51.5टक्क्यांनी खाली आली आहे. 2019 साली केलेल्या गणनेनुसार, देशातील गाढवांची एकूण संख्या सध्या केवळ 1.2 लाख इतकी आहे. 2012 मध्ये असलेल्या गाढवांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे 61.23% कमी आहे. (a study says number of donkeys has fallen down)

प्राण्यांच्या कल्याणासाठी असलेली संस्था 'ब्रूक इंडिया'चे एक्स्टर्नल अफेअर्स आणि कम्युनिकेशन हेड असलेले जोत प्रकाश यांनी ही माहिती दिली आहे. देशात गाढवांची संख्या अतिशय वेगानं कमी झाली आहे. हे अतिशय गंभीर आहे. विशेषतः चीनच्या बाजारांमध्ये गाढवाचं कातडं 'ईजीओ' या नावानं विकलं जातं आणि त्याला तिथं अतिशय मोठी मागणी आहे.(study of Brook India says donkeys decreased)

हेही वाचा रेशन दुकानातून रॉकेलचा काळाबाजार;ग्रामस्थांनी स्टिंग ऑपरेशन करून उघड केला प्रकार

गाढवांच्या कातड्यांची चीनच्या बाजारात निर्यात होते. यातून गाढवांची संख्या कमी होत आहे. याबाबत गांभीर्यानं तपास होण्याची गरज आहे. इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा गाढवाची संख्या अधिक कमी झालेली आहे. (china market demand donkey hide from India) ग्रामीण भागात अनेक गरीब लोकांचा व्यवसाय गाढवावर अवलंबून असतो. सोबतच घोडा आणि खेचरंही महत्त्वाची आहेत. (Brook India workshop in Delhi) या तिन्ही प्राण्याचं ग्रामीण जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'ब्रूक इंडिया'नं नुकतीच दिल्लीत एक कार्यशाळा घेतली. (donkey hide exported in china)

या कार्यशाळेत सांगितलं गेलं, की भारतीय अर्थव्यवस्थेत घडा, गाढव आणि खेचारानं दिलेलं योगदान आजवर नीटसं मोजलं गेलेलं नाही. याशिवाय माध्यमांमध्येही याबाबत कधी उल्लेख केला गेलेला आढळत नाही.(importance of donkeys in Indian economy)

या तीन प्राण्यांची संख्या घटत असली तरीही ग्रामीण भागात, विशेषतः मागास वर्गात आजही या तीन प्राण्यांचा लोकांना उत्पन्नासाठी मोठा आधार होतो. या प्राण्यांची मदत घेऊन विटा वाहिल्या जातात, बांधकाम व्यवसायात यांचा उपयोग होतो.

हेही वाचा आयुष्यात 'ही' गोष्ट शिकू शकलो नाही याचं दुःख, पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत

या कार्यशाळेत ब्रूक लंडनचे अधिकारी जेमी व्हेअर यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. लंडनमध्ये गाढवाच्या कातडीची खरेदी-विक्री रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी माहिती दिली. या कार्यशाळेत पत्रकार, कार्यकर्ते आणि ग्रामीण विकास व पर्यावरणासाठी काम करणारे लोक सहभागी झाले होते.

ब्रूक इंडिया आणि ब्रूक हॉस्पिटल फॉर ऍनिमल या प्राण्यांसाठीच्या कल्याणकारी संस्था आहेत. ब्रूक इंडिया ही संस्था ऍनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) शी संलग्न आहे.

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 4:19 PM IST

ताज्या बातम्या