VIDEO : हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी, 23 वर्षं तुरुंगात काढल्यावर झाली निर्दोष मुक्तता

VIDEO : हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी, 23 वर्षं तुरुंगात काढल्यावर झाली निर्दोष मुक्तता

काश्मीरमधले मोहम्मद अली, लतिफ वाजा आणि मिर्झा निसार या तरुणांना 1996 च्या बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झाली. त्यांनी तब्बल 23 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हे तरुण काश्मीरमधले होते हाच काय तो त्यांचा अपराध. त्यांची उमेदीची वर्षं तुरुंगात होरपळली. याला जबाबदार कोण, हा त्यांचा सवाल आहे.

  • Share this:

श्रीनगर, 25 जुलै : काश्मीरमधला मोहम्मद अली दहशतवादाच्या आरोपाखाली 23 वर्षं तुरुंगात होता. 1996 मध्ये जयपूर आग्रा हायवेवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि तुरुंगवासाची शिक्षा झाली. आज इतक्या वर्षांनंतर त्याची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

मोहम्मद अली आज 48 वर्षांचा आहे. दहशतवादाच्या आरोपाखाली त्याने 23 वर्षं तुरुंगात काढली. यात त्याचं सगळं तारुण्य होरपळलं. याच काळात तो त्याच्या आईवडिलांनाही गमावून बसला.

तुरुंगातून सुटल्यानंतर मोहम्मद अली आपल्या आईवडिलांना भेटला तो दफनभूमीतच. मोहम्मद अलीने पाणावलेल्या डोळ्यांनी मित्र आणि शेजाऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत आईवडिलांच्या थडग्याजवळ गेला. त्यांच्या आठवणीने त्याला गदगदून आलं. थडग्याजवळ डोकं टेकवून त्याने आईवडिलांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला...

मोहम्मद अली जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याची आई 2002 मध्ये मरण पावली. त्यानंतर 2015 मध्ये त्याच्या वडिलांचाही मृत्यू ओढवला.

जयपूर - आग्रा हायवेवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 14 जणांचा मृत्यू ओढवला तर 37 जण जखमी झाले. याच खटल्यामध्ये मोहम्मद अली आणि आणखी 4 जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं. आता 23 वर्षांनी या पाचही जणांची निर्दोष मुक्तता झाली पण एवढ्या वर्षांत त्यांचं आयुष्य होरपळून निघालं.

मोहम्मद अलीचा गालिचे बनवण्याचा व्यवसाय होता. तो कागद्याच्या लगद्यापासून वस्तू बनवण्यासाठी कागदाच्या लगद्याचाही पुरवठा करत असे. या व्यवयासासाठी तो काठमांडूला गेला आणि काश्मीरमधल्या हिंसाचारामुळे त्याने पुन्हा तिथे न येण्याचा निर्णय घेतला. पण त्याची नियती काही वेगळीच होती.

काठमांडूमध्ये झाली अटक

काठमांडूमध्ये 1996 साली तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. एक दिवस तो प्रार्थना करत असताना अचानक पोलिसांनी त्याला पकडलं. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आपल्याला का पकडलं गेलं हेही मोहम्मद अलीला माहीत नव्हतं. पोलीस त्यांना या बॉम्बस्फोटाबद्दल प्रश्न विचारत राहिले. त्यांना मारहाणही करण्यात आली. त्यांची रवानगी दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात झाली. तिहार आणि जयपूरच्या तुरुंगात त्यांची पाठवणी होत राहिली आणि आता अखेर 23 वर्षांनी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

VIDEO : अभिनंदनसारखं तुम्हीही पाडू शकता पाकचं एफ-16 विमान

मोहम्मद अलीच्या हाती आता काहीच उरलं नाही. तुरुंगामध्ये एवढी वर्षं काढून तो आता त्याच्या श्रीनगरमधल्या घरी आला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात करत असता, काहीतरी करू पाहता तेव्हा तुम्हाला तुरुंगात डांबलं जातं. तुमचे आईवडिल तुमची वाट बघून बघून एक दिवस मरूनही जातात. याला जबाबदार कोण, अली आर्ततेने विचारतो.

या सगळ्या परिस्थितीमुळेच अलीला जेव्हा तो निर्दोष सिद्ध झाला तेव्हा काय करावं तेच कळत नव्हतं. मोहम्मद अलीच्या सोबत आणखीही चार जणांची या खटल्यातून मुक्तता झाली. आता हे सगळे जण पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू पाहत आहेत पण दहशतवादाने होरपळलेल्या काश्मीरमध्ये एका बॉम्बस्फोट खटल्यात या निरपराध तरुणांचं आयुष्य वाया गेलं. ते पुन्हा कसं मिळवायचं हा त्यांचा प्रश्न आहे.

===================================================================================================================

शिवसेना खासदाराने मोदींना दिली श्रीकृष्णाची उपमा, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: July 25, 2019, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading