Home /News /national /

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला राहणार होते उपस्थित

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला राहणार होते उपस्थित

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) 26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) 26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र कोरोनाचा (Coronavirus) वाढता कहर आणि त्यातच नव कोरोनामुळे त्यांनी भारत दौरा रद्द केला, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन याबाबत माहिती दिली व प्रजासत्ताक दिनी येता येणार नसल्याने दिलगिरी व्यक्त केली. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे दोन वेरिएंट सापडल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये  सातत्याने वाढ होत आहे आणि म्हणूनच बोरिस जॉन्सन यांना आपला भारत दौरा रद्द करावा लागला. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या लोडमध्ये कमीत कमी 17 बदल झाले आहेत. (British Prime Minister Boris Johnsons visit to India canceled) सप्टेंबरमध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये याची पहिली घटना उघडकीस आली होती. हा प्रकार किती धोकादायक आहे याबाबत अधिकृत माहिती नसली तरी यामुळे मृतांचा आकडा जास्त आहे. हे स्ट्रेन पूर्वीच्या तुलनेत 70 टक्के वेगाने पसरते, जे कोरोना नियंत्रित करण्याच्या मार्गावरील सर्वात मोठे आव्हान आहे, असं सांगितलं जात आहे. नवीन स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन आहे. (British Prime Minister Boris Johnsons visit to India canceled) मंगळवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, हे संक्रमण अत्यंत वेगाने पसरत आहे आणि ते अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे. याशिवाय सध्या देशातील रूग्णालयात सर्वात जास्त साथीची रोग आहे. दरम्यान सर्वत्र कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहे. त्यात भारतात अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाची (corona vaccination) तारीख जाहीर केली आहे. 13 जानेवारी 2021 पासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. देशातील कोरोना लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाची तारीख सांगितली. 13 जानेवारीला कोरोना लशीचा (covid 19 vaccine) पहिला डोस दिला जाणार आहे, लसीकरणाची मोहीम चालवण्यासाठी चार मोठी केंद्र आहेत. हवाई मार्गानं लसीची वाहतूक केली जाणार आहे.  असं त्यांनी सांगितलं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या