हॉटेलमध्ये पत्नीचा संशयास्पद मृत्यू; हनिमूनसाठी गेलेल्या पतीला देश सोडण्यास बंदी

हॉटेलमध्ये पत्नीचा संशयास्पद मृत्यू; हनिमूनसाठी गेलेल्या पतीला देश सोडण्यास बंदी

भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिकाला पत्नीच्या मृत्यूची चौकशी संपेपर्यंत देश सोडण्यास श्रीलंकन पोलिसांनी मनाई केली आहे.

  • Share this:

कोलंबो, 11 मे : श्रीलंकेमध्ये हनिमूनदरम्यान पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिकाला देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. खिलन चंदारिया असं या 33 वर्षाच्या व्यक्तिचं नाव आहे. तर, हुशेला पटेल ( 31 वर्षे ) असं त्यांच्या पत्नीचं नाव होतं. खिलन यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पत्नीच्या मृत्यूची चौकशी संपेपर्यंत देश सोडू नका असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. खिलन चंदारिया यांचं नॉर्थ वेस्ट लंडन येथे फोनचं दुकान आहे. हनिमूनसाठी पती आणि पत्नी श्रीलंकेला आले होते. मला माझ्या पत्नीशिवाय जायचं नाही. संपूर्ण जग माझ्याविरोधात असल्याचं मला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया खिलन चंदारिया यांनी श्रीलंकेतून ब्रिटनच्या प्रसिद्ध माध्यमांना दिली आहे. श्रीलंकन पोलिस सध्या या साऱ्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राष्ट्रगीताला उभा राहिला नाही म्हणून सिनेमागृहात तरूणाला जमावाची मारहाण!

कसा झाला पत्नीचा मृत्यू?

19 एप्रिलला खिलन चंदारिया ( 33 वर्षे ) आणि हुशेला पटेल ( 31 वर्षे ) यांचं लग्न झालं. त्यानंतर नवदाम्पत्य हनिमूनसाठी श्रीलंकेत दाखल झालं. यावेळी त्यांनी आपला मुक्काम अमारी या फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये केला होता. श्रीलंकेनंतर त्यांचा मालदिवला जाण्याचा बेत होता.

25 एप्रिलला रिसॉर्टमध्ये थोडसं खाणं आणि ड्रिंक्स घेतल्यानंतर दोघांना अस्वस्थ वाटू लागलं. शिवाय, उलट्या देखील झाल्या. त्यानंतर लगेचच दोघांना रूग्णालयात हवलण्यात आलं. पण, दुर्दैवानं हुशेला पटेल यांचा मृत्यू झाला होता.

शवविच्छेदनानंतर डिहायड्रेशनमुळे हुशेला यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, खाण्यापूर्वी जेवणाला वेगळाच वास येत होता अशी माहिती खिलन चंदारिया यांनी दिली. पण, अमारी या फाईव्ह स्टार रिसॉर्टनं मात्र खाण्याच्या बाबतीत आम्ही सर्व नियम काटेकोरपणे पाळत असल्याचं म्हटलं आहे. या साऱ्या घटनेनंतर खिलन चंदारिया यांना श्रीलंकेत कुठेही फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. पण, चौकशी संपेपर्यंत देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

ब्रिटन सरकार सध्या खिलन चंदारिया यांच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

First published: May 12, 2019, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading