Home /News /national /

Fact Check : लोखंडी ब्रिज पावसात वाहून गेल्याचा तो Video आसाममधील नाहीच! 

Fact Check : लोखंडी ब्रिज पावसात वाहून गेल्याचा तो Video आसाममधील नाहीच! 

काय आहे त्या Video मागील सत्य...

    दिसपूर, 18 मे : आसामममधील (Assam News) अनेक जिल्ह्यात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 20 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख लोक प्रभावित झाले आहेत. सातत्याने कोसळणारा पाऊस, भूस्खलन आदी कारणांमुळे रेल्वे आणि रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. दीमा हसाओ पर्वतीय जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातत्याने पाऊस पडत असून पूर आणि भूस्खलनामुळे राज्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हिडीओमध्ये दिमा हसाओमध्ये न्यू हाफलोंग रेल्वे स्टेशनवर गाळच गाळ दिसत आहे. यासंदर्भातील रेल्वेचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पूल तुटून वाहून गेल्याचाही एक व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र तो व्हिडीओ इंडोनेशीयाचा असल्याचं समोर आलं आहे. तो व्हिडीओ आसाममधील नसून इंडोनेशियातील जुना व्हिडीओ असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू.. आसाममधील पूरामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. भारतीय रेल्वेने वायुसेनाच्या मदतीने दोन ट्रेनमधून तब्बल 2800 प्रवाशांना वाचवलं आहे. हे गेल्या दोन दिवसांपूर्वी दीमा हसाओमध्ये लुमडिंग-बदलपूर सेक्शनवर अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. हे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित कछार, दिमा हसाओ, होजाई, चराईदेव, दरंग, धेमाजी, दिब्रुगड, बजली, बक्सा, विश्वनाथ आणि लखीमपूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या दिमा-हसाओ जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या डोंगराळ विभागातील परिस्थिती मंगळवारी भीषण राहिली कारण डोंगराळ भागात पाऊस सुरूच होता, ज्यामुळे लुमडिंग-बदरपूर सिंगल लाइन रेल्वे मार्गावर परिणाम झाला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Viral video.

    पुढील बातम्या