Home /News /national /

लग्नात वरमुलगा समोर आल्यावर वधूला बसला धक्का, खोलीत जाऊन उचललं टोकाचं पाऊल

लग्नात वरमुलगा समोर आल्यावर वधूला बसला धक्का, खोलीत जाऊन उचललं टोकाचं पाऊल

खरौली गावात एका गेस्ट हाऊसमध्ये विवाह सोहळा सुरू होता. कानपूरच्या महाराजपुरा येथून वरात आली होती, त्यानंतर लग्नाच्या विधींना सुरुवात झाली.

    फतेहपूर, 5 जुलै : उत्तर प्रदेशातील फतेहपूर (Fatehpur UP) जिल्ह्यात आत्महत्येच्या एका घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. याठिकाणी वधूने विष घेत आत्महत्या (Bride Suicide in marriage) करुन टाकली. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे लग्न विधी सुरू असतानाच वधू अचानक मंडपातून उठली आणि तीच्या रुममध्ये चालली गेली. आपल्या रुममध्ये आल्यानंतर तिने विष घेतले. यानंतर कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात (Bride in hospital) नेले. मात्र, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू (Bride death) झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण -  मृत्यूची बातमी समजताच आनंदाचे शोकात रूपांतर झाले आणि वरात घरी परतली. या संपूर्ण घटनेमागचे कारण समजल्यावर सर्वच अस्वस्थ झाले. लग्नाच्या दिवशी लग्नमंडपातच तिला वरमुलाचे वय हे तिच्यापेक्षा खूप जास्त आहे, असे समजले. यानंतर तिने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत विष घेतले. या घटनेचा सर्वांनाच मोठा धक्का बसला. तर या तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना कोणतीच माहिती दिली नाही आणि तिच्यावर अंतिम संस्कार करुन टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खरौली गावात घडली. येथे एका गेस्ट हाऊसमध्ये विवाह सोहळा सुरू होता. कानपूरच्या महाराजपुरा येथून वरात आली होती, त्यानंतर लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. मात्र, वधूने तिच्यापेक्षा वयाने खूप जास्त मोठ्या असलेल्या वराला पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने अचानक मंडपातून उठून खोलीत जाऊन विष घेतले. वधूची ढासळलेली तब्येत पाहून नातेवाईकांना तिने विष घेतल्याचे समजले. यानंतर तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला कानपूरला रेफर करण्यात आले. मात्र, यादरम्यान वाटेतच तिचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मृत्यूची बातमी मिळताच वरातही घरी परतली. यानंतर कुटुंबीयांनी नदीच्या काठावर या मुलीवर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हेही वाचा - साखरपुडा मोडला गेल्याने तरुणीचं टोकाचं पाऊल, होणारा पती अन् त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल त्याचवेळी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या संदर्भात पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र, तक्रार आल्यास चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bride, Bridegroom, Suicide news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या