सेल्फी पाठवून बोलवली टॅक्सी आणि नवरीने दागिन्यांसह केला पोबारा

जयपूरमध्ये लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी एक तरुणी टॅक्सीत बसून पळून गेली. तिने जयपूरच्या मनीष गुप्ता नावाच्या एका व्यक्तीला फसवलं. ही काही प्रेमकहाणी नाही तर एका 'लुटारू दुल्हन' चे कारनामे आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 05:58 PM IST

सेल्फी पाठवून बोलवली टॅक्सी आणि नवरीने दागिन्यांसह केला पोबारा

जयपूर, 4 जुलै : जयपूरमध्ये लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी एक तरुणी टॅक्सीत बसून पळून गेली. तिने जयपूरच्या मनीष गुप्ता नावाच्या एका व्यक्तीला फसवलं. ही काही प्रेमकहाणी नाही तर एका 'लुटारू दुल्हन' चे कारनामे आहेत.

या तरुणीचं नाव आहे रिया. रियाच्या गँगमध्ये तिचे अजून तीन साथीदार आहेत. त्यांच्याशी हातमिळवणी करून रियाने मनीषच्या घरातले 2 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.

मनीष आणि रिया यांचं 24 जूनला जयपूरमध्ये लग्न झालं. मनीष मूकबधिर आहे. तो ऐकूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. त्यामुळे अनेक दिवस त्याचं लग्न होत नव्हतं. अखेर एक दिवस मनीषच्या ओळखीतले एक जण लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. पण हा लग्नाचा प्रस्ताव मनीष यांना अशा प्रकारे भोवला.

अनाथ असल्याची थाप

बनवारी आणि संजय या दोघांनी मनीषच्या कुटुंबीयांची या एका मुलीच्या मावशीशी भेट घडवली. गीताने रिया आणि तिची बहीण अनाथ असल्याची बतावणी केली. या मुलींचं लवकर लग्न करायचं आहे,असं तिने सांगितलं.

Loading...

मनीष आणि रिया यांचं राजपार्कमधल्या राम मंदिरात लग्न लावण्यात आलं. त्यानंतर गावातल्या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी मनीष आणि रिया तयार झाले. रियाने सगळे दागिने घातले आणि औषध आणण्यासाठी जात असल्याची थाप मारली.

अंध असूनही तिने 'यूपीएससी' परीक्षेत मिळवलं घवघवीत यश !

बाहेर पडल्यानंतर एक टॅक्सी तिला घेण्यासाठी आलीच होती. त्यात बसून ती फरार झाली. रियाने आधीच पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता. तिने मोबाइलवरून घराच्या नेमप्लेटसह सेल्फी काढला आणि आपल्या साथीदारांना पत्ता कळवला. याच पत्त्यावर तिचे साथीदार पोहोचले आणि त्यांनी पोबारा केला.

============================================================================================

VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...