मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुखाचा क्षण दुःखात बदलला ; पाठवणीवेळी अति रडल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं नवरीचा मृत्यू

सुखाचा क्षण दुःखात बदलला ; पाठवणीवेळी अति रडल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं नवरीचा मृत्यू

लग्नानंतर आपल्या सासरी जाताना माहेर सोडण्याचं दुःख प्रत्येक मुलीला असतं. त्यामुळे पाठवणीवेळी जवळपास सगळ्याच नवऱ्या रडतात. मात्र, याच गोष्टीनं आता एका नवरीचा जीव घेतल्याची (Bride Died of a Heart Attack) धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 मार्च : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव आणि घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी आनंदाचा क्षण असतो. कारण, यादिवशी अनेक नवी नाती आणि माणसं जोडली जातात. मात्र, हाच सुखाचा क्षण अचानक एका भयंकर वळणावर येऊन थांबतो, तेव्हा? लग्नानंतर आपल्या सासरी जाताना माहेर सोडण्याचं दुःख प्रत्येक मुलीला असतं. त्यामुळे पाठवणीवेळी जवळपास सगळ्याच नवऱ्या रडतात. मात्र, याच गोष्टीनं आता एका नवरीचा जीव घेतल्याची (Bride Died of a Heart Attack) धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ही घटना आहे ओडिशाच्या सोनूपर जिल्ह्यातील. माहेर सोडताना अतिप्रमाणात रडल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं नवरीचा मृत्यू झाला आहे. गुप्तेश्वरी साहो अका रोझी असं तिचं नाव आहे. जुलुंदा गावातील रोझी हिचा तेतेलगावातील बिसीकेसन नावाच्या एका तरुणासोबत शुक्रवारी विवाह झाला. मात्र, जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा रोझी रडू लागली आणि याच दरम्यान ती जमिनीवर कोसळली. नातेवाईकांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून आणि हाताची मसाज करून तिला उठवण्याचा प्रयत्न केला.

नातेवाईकांनी अनेक प्रयत्न केल्यानंतरही रोझी मात्र उठली नाही, तेव्हा तिला तात्काळ जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. इंडिया टूडेनं दिलेल्या वृत्तानुसार, गावातील एका व्यक्तीनं सांगितलं, की काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झाल्यानं ती प्रचंड तणावात होती. तिच्या नातेवाईकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Bridegroom, Heart Attack, Marriage