नवरदेवाला नागीन डान्स भोवला, वधूनं मोडलं लग्न

नवरदेवाला नागीन डान्स भोवला, वधूनं मोडलं लग्न

वरातीसोबत नाचणारा नवरदेव आणि नागीन डान्स करणारे त्याचे मित्र हे आता एक कॉमन चित्र झालंय.पण हाच नागीन डान्स करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलंय

  • Share this:

30 जून : लग्न म्हटलं की वरात आलीच. वरातीसोबत नाचणारा नवरदेव आणि नागीन डान्स करणारे त्याचे मित्र हे आता एक कॉमन चित्र झालंय.पण हाच नागीन डान्स करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलंय. कारण लग्नाच्या थोडा वेळ आधी नागीन डान्स केल्यानं या नवरदेवाचं लग्नच मोडलंय.

तर बातमी आहे उत्तर प्रदेशातल्या शहाजहानपूरची.अभिषेक मिश्रा आणि प्रियांका त्रिपाठी अशी वधू वरांची नावं आहेत. लग्नाच्या आधी थोडा वेळ नवरदेव पू्र्ण दारू पिऊन होता.एवढंच नाही तर त्यानं अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीनं नागीन डान्स केला .तो नागीन डान्स करत असताना त्याच्या मित्रांनी त्याच्यावर पैसेही उधळले. हे सगळं प्रियांकाला सहन न झाल्यानं तिनं लगेच लग्न मोडलं आणि एवढचं नाही तर दुसऱ्याच दिवशी एका सोज्वळ मुलाशी लग्नही केलं. नवऱ्याच्या मित्रांनी तिला धमकावलंही.नवरदेवाच्या कुटुंबानं तिची माफीही मागितली. पण तिनं कुणाचंच काही ऐकलं नाही.

या सगळ्या प्रकारात मुलीचे वडील मात्र तिच्यामागे खंबीरपणे उभे राहिले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading