हुंड्यात दिलेला पलंग परत मागितला म्हणून सासऱ्यानं सुनेवर झाडली गोळी

हुंड्यात दिलेला पलंग परत मागितला म्हणून सासऱ्यानं सुनेवर झाडली गोळी

2016मध्ये महिलेचं लग्न झालं होतं. त्यानंतर वाढत्या जाचाला कंटाळून तिनं घर सोडलं होतं.

  • Share this:

पाटणा, 13 मे : देशात हुंडा प्रथा आज देखील सुरूच आहे. हुंडा देताना प्रत्येक गोष्ट दिली जाते. शिवाय, हुंडाबळी गेल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पण, आता बिहारमधील भागलपूर भागात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हुंड्यात दिलेला पलंग परत मागितला म्हणून सासऱ्यानं सुनेवर गोळी झाडली. त्यामध्ये सून जखमी झाली असून सध्या तिच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत.

मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

काय आहे सारा प्रकार

जखमी महिलेचं लग्न 2016मध्ये सुर्य़शंकर साह यांचा मुलगा भावेश भास्कर यांच्यासोबत झालं होतं. यावेळी हुंड्यामध्ये सर्व गोष्टी देण्यात आल्या होत्या. पण, सासरचा जाच काही थांबत नव्हता. जखमी महिलेवर आणखी हुंडा मिळावा यासाठी दबाव टाकला जात होता. शिवाय, त्रास देखील दिला जात होता. अखेर वाढत्या जाचाला कंटाळून संबंधित महिलेनं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं दुसऱ्या ठिकाणी संसार देखील थाटला.

रविवारी संबंधित महिला सुतार काम करणाऱ्या व्यक्तिला घेऊन सासरी दाखल होत हुंड्यामध्ये मिळालेल्या पलंगाची मागणी केली. त्यामुळे रागाने लालेलाल सुर्य़शंकर साह यांनी गोळी झाडली. यामध्ये महिला जखमी झाली असून बाबरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमी महिलेच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

First published: May 13, 2019, 1:22 PM IST
Tags: bribe

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading