Home /News /national /

तीरथसिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री: काँग्रेसच्या खासदार बाईंचा थेट मोदींनाच टोमणा; काय म्हणाल्या वाचा..

तीरथसिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री: काँग्रेसच्या खासदार बाईंचा थेट मोदींनाच टोमणा; काय म्हणाल्या वाचा..

उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत (uttarakhand cm tirath singh rawat) यांनी शपथ घेतली. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटात जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती.

    डेहराडून, 10 मार्च: उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत (uttarakhand cm tirath singh rawat) यांनी शपथ घेतली. भाजपच्याच काही आमदारांना आधीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांना विरोध होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेच पक्षांतर्गत निर्णय घेत उत्तराखंडला नवा मुख्यमंत्री दिला. पण (Congress MP on Uttarakhand CM change) काँग्रेसने या बदलावर काय प्रतिक्रिया दिली आहे हे एका महिला खासदारांनी केलेल्या ट्वीटवरून स्पष्ट होतं. भाजपच्या राजकारणाला टोमणा मारताना खासदार ज्योत्स्ना चरणदास महंत यांनी थेट पक्षनेतृत्वाला म्हणजे मोदींना निशाणा केलं आहे. ज्योत्स्ना महंत (Jyotsna Mahant) या छत्तीसगडमधल्या काँग्रेस खासदार आहेत. त्या कोरबा (Korba MP) मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत. भाजपच्या राजकारणावर शालजोडीतले हाणताना किंवा ठेवणीतले बोल लावताना ज्योत्स्ना यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. 'बहुत दिनों से कहीं मुख्यमंत्री बदलने को नहीं मिला तो अपना ही बदल लिय' असं म्हणत त्यांनी एक इमोजीही ट्वीट केला आहे. त्यांच्या या वन लायनरला अनेकांनी डोक्यावर घेतलं आहे. तर काही भाजप समर्थकांनी काँग्रेसलाच याबद्दल धडा शिका असं सुनावलं आहे. काही ट्विटर यूजर्सनी मध्य प्रदेशचं उदाहरण देत योग्य वेळी मुख्यमंत्री बदलला नाही तर काय होतं पाहा असं म्हणत टोमणा मारला आहे. कोण आहेत तीरथ सिंह रावत ? भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी प्रदेशाध्यक्ष आणि उत्तराखंडचे माजी शिक्षणमंत्री अशा जबाबदाऱ्या रावत यांनी सांभाळल्या आहेत. ते 1983 ते 1988 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की.., अजित पवारांचे सूचक विधान रावत हे 1997 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य झाले. उत्तराखंड राज्याची 2000 साली निर्मिती झाल्यानंतर ते राज्याचे पहिले शिक्षण मंत्री बनले. (First Education Minster of  Uttarakhand) भाजपाने 2007 साली त्यांची प्रदेश महामंत्री म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्यांनी  निवडणूक अधिकारी तसेच प्रदेश सदस्यता  प्रमुख देखील होते.  रावत यांची 2013 साली उत्तराखंड प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. तर 2017 साली ते राष्ट्रीय सरचिटणीस बनले. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचादरम्यान अखेर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी राजीनामा (Uttarakhand Chief Minister resignation) दिला आहे. भाजपमधील अनेक मोठ्या नेत्यांचं समर्थन असतानाही रावत यांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे. त्यांच्या राजीनाम्याचं सर्वात महत्त्वाचं कारण पक्षातील आमदार आणि नेत्यांच्या एका वर्गात असणारी नाराजी सांगितली जात आहे.
    First published:

    Tags: Chattisgarh, Congress, Narendra modi, Uttarakhand

    पुढील बातम्या