पणजी, 21 मे: लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणारे तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त (Tarun Tejpal acquitted by Goa court in sexual assault case) केले आहे. 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मे 2014 पासून तरुण तेजपाल जामीनावर बाहेर होते.
Goa: Former Editor-in-Chief of Tehelka Magazine, Tarun Tejpal acquitted of all charges in the alleged sexual assault case against him.
(File photo) pic.twitter.com/peaMdXUfHV — ANI (@ANI) May 21, 2021
देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. अखेर 21 मे रोजी तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. गोवा पोलिसात फेब्रुवारी 2014 मध्ये 2846 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली होती. तेजपाल यांच्यावर भादवी कलम 341, 342, 354, 354-ए, 354 बी, 376 (2) (एफ), 376 (2) (के) अंतर्गत सुनावणी सुरू होती.
यानंतर जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात तेजपाल यांनी नि:पक्षपाती सुनावणी केल्याबद्दल, तसंच सीसीटीव्ही फुटेज तसंच इतर रेकॉर्ड्सची कसून तपासणी केल्याबद्दल त्यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.
हे वाचा-पुण्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
नोव्हेंबर 2013 मध्ये एका सहकाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप केल्याचे सांगत तेजपाल यांनी या निवेदनात असं म्हटलं आहे की, 'आज गोव्यातील माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी माझी सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. ज्यावेळी धैर्य दुर्मिळ झाले आहे, त्यावेळी सत्याची साथ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.' या निवेदनातून त्यांनी त्यांचा खटला लढणाऱ्या सर्व वकिलांच्या टीमचे देखील आभार मानले आहेत. याशिवाय या काळात त्यांची साथ देणाऱ्या कुटुंबीयांचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.