नवी दिल्ली, 1 जानेवारी: ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवतारामुळे (New strain of Coronavirus in UK) जगभरात दहशत पसरली आहे. या नव्या कोरोनाचं संकट भारतात येऊ नये म्हणून तातडीने निर्णय घेत केंद्र सरकारने ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं काही दिवसांपुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत असलेली ही विमान उड्डाणांवरची बंदी आणखी वाढवण्याचाही निर्णयही झाला. पण आता ही बंदी उठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 8 तारखेपासून भारत आणि यूकेदरम्यानची विमानसेवा सुरू होईल.
गेल्या 23 डिसेंबरपासून या दोन देशांमधली विमान वाहतूक बंद होती. फक्त मालवाहतूक (Cargo) सुरू होती. पण प्रवाशांसाठी सर्व विमानं रद्द करण्यात आली होती. आता ब्रिटनला जाणारी फ्लाइट्स 8 जानेवारीपासून सुरू होतील पण सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागणार आहे.
It has been decided that flights between India & UK will resume from 8th January, 2021. Operations till 23 Jan will be restricted to 15 flights per week each for carriers of two countries to & from Delhi, Mumbai, Bengaluru & Hyderabad only: Union Civil Aviation Minister pic.twitter.com/IsBiCFhvg9
— ANI (@ANI) January 1, 2021
23 जानेवारीपर्यंत फक्त आठवड्याला 15 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद इथून यूकेला जाणारी फक्त 15 विमानं दर आठवड्याला उडू शकतील, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
कोरोनाव्हायरसच्या (New Coronavirus) दहशतीमुळे जवळपास महिन्याभरासाठी भारत - ब्रिटन दरम्यानची विमान सेवा विस्कळीत राहणार आहे. 23 तारखेनंतर विमानसेवा पूर्वरत सुरळीत करायची की नाही याचा निर्णय कोरोना परिस्थितीनुसार ठरवण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus