Home /News /national /

PM मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकरने मागितले चक्क बिटकॉइन

PM मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकरने मागितले चक्क बिटकॉइन

चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ) यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं narendramodi.in ट्विटर अकाऊंट (Twitter account) हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

    नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. हे खातं त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडलं गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यावर तब्बल 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकरने खातं हॅक केल्यानंतर चक्क बिटकॉईनची मागणी केली. यासंबंधी एक ट्विटही करण्यात आलं होतं. हॅकर्सनी ट्वीट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी द्या असं लिहिलं गेलं होतं. पण त्यानंतर तात्काळ हे ट्वीट डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, 'कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास अपील करतो'. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटची लिंक अकाऊंट असल्याची कबुली दिली आहे. काय आहे बिटकॉइन? गेल्या काही दिवसांमध्ये बिटकॉइन विषयी चर्चा वाढली आहे. बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. हे डॉलर, रूपये किंवा पौंड सारख्या अन्य चलनांमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकतात. हे चलन 2009 मध्ये बिटकॉइनच्या रूपात वापरात आलं होतं. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठीही केला जात आहे. मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू पडला चिअरलीडरच्या प्रेमात, मॅच दरम्यानच जडला जीव अमेरिकन दिग्गजांचीही खाती झाली होती हॅक याआधी अनेक दिग्गजांचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. अमेरिकेतील अनेक दिग्गज व्यक्तींची ट्विटर अकाउंट जुलैमध्ये हॅक झाली होती. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत आणि गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचा समावेश होता. इतकंच नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार जो बिडेन यांचे ट्विटर हँडलही हॅक झाले होते. आयफोनचा निर्माता Apple ही हॅकर्सच्या ताब्यात आला होता. त्यावेळीसुद्धा, हॅकर्सनी बिटकॉइन चलन मागितले होते.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या