महाठग नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, आजच कोर्टात हजर करणार

भारतीय बँकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला थोड्याचवेळात कोर्टात हजर केले जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 03:38 PM IST

महाठग नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, आजच कोर्टात हजर करणार

लंडन, 20 मार्च: पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला थोड्याचवेळात कोर्टात हजर केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 18 मार्च रोजी नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे. 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला होता. तसेच नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो 'वेस्ट एन्ड लंडन'मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला होता.


VIDEO : रणजित तर आले विजयसिंह मोहितेंचं काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nirav modi
First Published: Mar 20, 2019 03:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...