नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या भेटीला पोहोचले आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर अमित शहा यांच्यासोबत ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
नारायण राणे आज संध्याकाळी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले आहे. मागील महिन्यात नारायण राणे यांना अटक झाली होती. या अटकेमुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर राणेंनी अमित शहा यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज राणे पहिल्यांदाच शह यांना भेटीसाठी पोहोचले आहे.
या भेटीमध्ये राज्यातील परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Explainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती? कोणता आखाडा आहे श्रीमंत?
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संसदीय प्रणाली माहित नाही त्यामुळे त्यांनी राज्यपालाला पत्र लिहिलं. राज्यपालांना अधिकार असतो राज्याच्या सत्ताधारी पक्षाला देण्याचा. पण उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या प्रकारांची माहिती नाही. त्यामुळे प्रथम त्यांनी एखाद्या अधिक माहिती करून घ्यावी. सोबतच अनंत गीते जे बोलले त्यामध्ये सत्यता आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.