पनवेल आणि नवी मुंबईला जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन ठप्प झालं. दुसरीकडे, राजधानी मुंबईतील विविध ठिकाणी हलक्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळालं.
10:16 pm (IST)
मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
उद्या संध्याकाळी 6.30 वा. 'सह्याद्री'वर महत्वाची बैठक
मुख्यमंत्री ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करणार
बैठकीत स्थगिती उठवण्याबाबत पर्यायांवर होणार चर्चा
10:01 pm (IST)
राज्यात लवकरच पोलिसांची मेगाभरती?
उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीन सिग्नलची शक्यता
कोरोना काळात पोलिसांवर ताण वाढल्यानं हालचाली
9:39 pm (IST)
पुण्यात दिवसभरात 1691 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 1563 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात आज 53 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17,478
9:25 pm (IST)
नाशिक - शेतकऱ्यांना आधार पीक कर्जाचा
नाशिक जिल्ह्यात विक्रमी पीक कर्जवाटप
2010 कोटींचा गाठला टप्पा, उद्दिष्टाच्या 60% वाटप
गेल्या 10 वर्षांमधील विक्रमी वाटप रक्कम
नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेंची माहिती
8:36 pm (IST)
नागपूर जिल्ह्यात आज कोरोनाच्या 1,957 रुग्णांची भर
नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे 48 रुग्णांचा मृत्यू
नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 55 हजार 430 वर
8:27 pm (IST)
Breaking News
नवी मुंबई -- मराठा समाज उद्या नवी मुंबईत पुकारणार आंदोलन.
शिवाजी चौकात एकत्रित येत घोषणाबाजी करत करणार आंदोलन.
नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनला देणार मागण्यांचं निवेदन.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या बैठकीत झाला निर्णय.
सोशल डिस्टन्सिंग पाळत व जमावबंदी टाळत करणार आंदोलन.
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीच्या विरोधात मराठा समाज आक्रमक.
8:27 pm (IST)
राज्यात आज 20 हजार 482 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात आज 515 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 19,423 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 70.62 टक्के
सध्या राज्यातील मृत्युदर 2.77 टक्क्यांइतका
राज्यात सध्या 2 लाख 91 हजार 797 अॅक्टिव्ह रुग्ण
7:59 pm (IST)
कांद्याच्या निर्यातबंदीवरून कॉंग्रेस आक्रमक
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, उद्या राज्यव्यापी आंदोलन
केंद्र सरकारच्या निर्णयाचा कॉंग्रेस करणार निषेध