LIVE: राज्यात 4 महिन्यांतले सर्वाधिक कोरोना रुग्ण; 24 तासांत 15,817

कोरोना आणि राज्यासह संपूर्ण देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट

 • News18 Lokmat
 • | March 12, 2021, 20:05 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:12 (IST)

  अहमदाबाद - भारत X इंग्लंड पहिली टी-20
  इंग्लंडचा भारतावर दमदार विजय
  भारताचा 8 विकेट्स राखून केला पराभव
  टी-20 मालिकेत इंग्लंडची 1-0 आघाडी

  22:0 (IST)

  हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
  विविध अभियांत्रिकी, देखभाल कामांसाठी ब्लॉक
  कुर्ला-वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
  सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक
  ठाणे-वाशी/नेरूळ अप-डाऊन ट्रान्स हार्बरवर ब्लॉक
  सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक

  20:50 (IST)

  सावधान ! मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतेय
  मुंबईत दिवसभरात 1646 नवे रुग्ण, 4 मृत्यू
  कंटेन्मेंट झोन अधिक प्रभावीपणे अमलात आणणार

  20:44 (IST)

  अहमदाबाद - भारत X इंग्लंड पहिली टी-20
  भारताच्या 20 षटकांत 7 बाद 124 धावा
  इंग्लंडसमोर विजयासाठी 125 धावांचं आव्हान
  श्रेयस अय्यरची 67 धावांची दमदार खेळी

  20:29 (IST)

  मराठा समाजातील संघटनांचे समन्वयक, वकिलांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद, मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई समन्वयानं,
  एकजुटीनं लढू आणि जिंकू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  20:7 (IST)

  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं 15 जून 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपनगरी आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये सखोल व 
  नियमित तिकीट तपासणी मोहीम चालवली; या तपासणी दरम्यान विनातिकीट/अनियमित प्रवासाची 2.38 लाख प्रकरणं आढळली आणि त्यातून दंड म्हणून 7.61 कोटी रुपये वसूल

  20:3 (IST)

  राज्यात 4 महिन्यांतले सर्वाधिक कोरोना रुग्ण; 24 तासांत 15,817

  कोरोना निर्बंध कडक करूनही कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हायचं नाव घेत नाही. राज्यातली कोरोना स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होते आहे.

  शुक्रवारी चार महिन्यांतली सर्वाधिक संख्या नोंदली गेली. 

  गेल्या 24 तासांत 15817 नवे कोरोना रुग्ण सापडले. तर 56 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 11344 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

  20:2 (IST)

  नाशिक जिल्ह्यात रुग्णांचा वाढता आलेख कायम
  नाशिकमध्ये दिवसभरात 1135 नवे रुग्ण
  नाशिकमध्ये दिवसभरात 456 रुग्ण बरे
  नाशिकमध्ये दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू

  19:57 (IST)

  नागपूर - कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी नागपूर पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 3 कॉन्स्टेबलचं निलंबन, पोलीस उपनिरीक्षक लाखडे, कॉन्स्टेबल रोशन यादव, राहुल बोहरे आणि संजय पांडे यांच्यावर कारवाई, पोलीस आयुक्तांनी दिले निलंबनाचे आदेश

  19:52 (IST)

  सातारा - आणेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
  टोलनाक्यावरील कामगारांकडून अचानक काम बंद
  पगार मिळत नसल्यानं केलं काम बंद आंदोलन
  गेल्या तासाभरापासून वाहनधारक खोळंबले

  कोरोना आणि राज्यासह संपूर्ण देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट