LIVE : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास मुंबई पोलीस करणार की CBI? उद्या सुप्रीम कोर्टात होईल स्पष्ट

महाराष्ट्र आणि देशभरातल्या ताज्या बातम्यांचे latest updates.

 • News18 Lokmat
 • | August 18, 2020, 21:10 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:58 (IST)

  संजय दत्त उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये
  अभिनेते संजय दत्त यांच्या फुफ्फुसाचा कर्करोग चौथ्या टप्प्यावर

  20:53 (IST)
  महाराष्ट्रात आज कोरोनाचे 11,119 नवे रुग्ण
  राज्यात आज 11 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी
  राज्यात आज रेकॉर्डब्रेक 424 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  राज्यात आज दिवसभरात 9,356 जण कोरोनामुक्त
  राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 15 हजार
  राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण 1 लाख 56 हजार​
   
  19:56 (IST)

  देशाचा कोरोना मृत्युदर 1.92 टक्क्यांवर -देवेंद्र फडणवीस
  'मुंबईतील ऑगस्टमधील 17 दिवसांत मृत्युदर 5.40 टक्क्यांवर'
  मुंबईत चाचण्या वाढवण्याची नितांत गरज -देवेंद्र फडणवीस
  देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा मागणी पत्र

  19:44 (IST)

  रियाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या देणार निर्णय
  उद्या सकाळी 11 वाजता निर्णय येण्याची शक्यता

  19:34 (IST)
  अजित पवार आणि रोहित पवारांची भेट
  पार्थ पवार वादानंतर पहिल्यांदाच भेट
  'थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल मला भावते'
  अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांचं ट्विट
  19:15 (IST)

  कल्याण-डोंबिवलीतील व्यापारी, दुकानदारांना केडीएमसीचा दिलासा
  कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रवगळता इतर ठिकाणी पी-1, पी-2 नियम रद्द
  कल्याण-डोंबिवलीत उद्यापासून अटी, शर्तींसह होणार अंमलबजावणी
  सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा
  मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, जिम, स्विमिंग पूल मात्र बंदच

  19:9 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा महत्वाचा निर्णय
  अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ
  मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी
  चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला चोख प्रत्युत्तर

  18:6 (IST)

  आता एसटी डेपोमध्ये पेट्रोलपंप उघडले जाणार
  एसटीच्या जागेत पेट्रोलपंप उत्पन्नाचा नवा स्रोत
  राज्यात 30 ठिकाणी पेट्रोलपंप आणि 5 एलपीजी पंप
  इंडियन ऑईल पंप उभारणार तर एसटी पंप चालवणार

  17:7 (IST)

  खासगी डॉक्टरांनाही 50 लाख रुपयांचं विमा कवच -आरोग्यमंत्री राजेश टोपे
  'नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी आणि डायरेक्टर हेल्थ यांचं प्रमाणपत्र द्यावं'

  16:44 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे स्मारकात बैठक सुरू
  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित
  पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांसह सुशांतसिंह प्रकरणी चर्चा

  मुंबई : महाराष्ट्र आणि देशभरातल्या ताज्या बातम्यांचे latest updates.