Home /News /national /

आणखी एक धक्कादायक आत्महत्या! माजी राज्यपाल आणि CBI च्या माजी संचालकांनी घेतला गळफास?

आणखी एक धक्कादायक आत्महत्या! माजी राज्यपाल आणि CBI च्या माजी संचालकांनी घेतला गळफास?

BREAKING News! CBI चे माजी संचालक आणि नागालँड- मणिपूरचं राज्यपालपद भूषवलेले अश्वनी कुमार त्यांच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

    शिमला, 7 ऑक्टोबर : सीबीआयचे माजी संचालक(CBI ex Director) अश्विनी कुमार (Ashwani kumar found dead) यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी अश्वनी कुमार यांनी त्यांच्या शिमल्यामधल्या ब्रॉकहोर्स्ट या त्यांच्या राहच्या घरी गळफास लावल्याचं सांगण्यात येत आहे. शिमल्याचे पोलीस अधिक्षक मोहित चावला यांनी धक्कादायक घटना घडल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. सीबीआयचे माजी संचालक असलेले अश्विनी कुमार हे नागालँड मणीपूरचे माजी राज्यपालही होते. दरम्यान अश्विनी कुमार यांची सुसाइड नोटही मिळाली आहे. कुटुंबावर ओझं बनायचं नाही, असं या सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. मागच्या काही काळापासून अश्विनी कुमार डिप्रेशनमध्ये होते. अश्विनी कुमार हे हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालकही होते. ऑगस्ट 2006 ते जुलै 2008 या कालावधीमध्ये त्यांनी महासंचलक पद भुषवलं. तर ऑगस्ट 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात त्यांनी सीबीआय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर ही मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरची ही दुसरी धक्कादायक बातमी आहे. अश्विनी कुमार यांच्याप्रमाणेच 14 जूनला सुशांतसिंह राजपूतही त्याच्या वांद्र्याच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या करण्यात आली? यावरुन बराच वाद झाला. अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे आदेश दिले. सीबीआयच्या टीमनेही मुंबईमध्ये येऊन याप्रकरणाचा तपास केला. एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या