दिल्लीत पुन्हा भूकंप; इमारती हादरल्या, नागरिकांची पळापळ

दिल्लीत पुन्हा भूकंप; इमारती हादरल्या, नागरिकांची पळापळ

दिल्ली आणि परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. काही सेकंद धक्के जाणवत होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : दिल्ली आणि परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. काही सेकंद धक्के जाणवत होते. त्यामुळे दिल्लीकरांची भीतीने पळापळ झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उत्तर भारताला भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत.

दिल्लीत संध्याकाळी  7 च्या सुमारास भूकंप झाला.  इमारती हादरल्या. काही सेकंद धक्के जाणवत राहिल्याने लोकांनी इमारतीबाहेर धाव घेतली.

National Centre for Seismology ने दिलेल्या माहितीनुसार, गुरगावपासून नैर्ऋत्येला 63 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी नोंदली गेली.

गेल्या दोन महिन्यात राजधानीला तब्बल 13 कमी-अधिक तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता फार नसल्यामुळे यातून जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही.

आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास ईशान्य भारतातही मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला. मिझोराममझ्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केलवर होती. चंफई हे मिझोराममधलं गाव भूकंपाचं केंद्र होतं.

ही बातमी अपडेट होत आहे.

First published: July 3, 2020, 7:17 PM IST

ताज्या बातम्या