BREAKING : काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

मयत सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे आज सकाळी ठरल्याप्रमाणे कारने रवाना झाले होते.

मयत सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे आज सकाळी ठरल्याप्रमाणे कारने रवाना झाले होते.

  • Share this:
      आजमगड, 20 ऑगस्ट : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. पण, आता उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील बसगावमध्ये मागस वर्गात सरपंचाची हत्या झाली होती. या सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे आज सकाळी ठरल्यामुळे कारने रवाना झाले होते. परंतु,आजमगड सीमा भागात पोहोचल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले. नितीन राऊत यांना आजमगडमध्ये येण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटकाव केला. त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहे. बसगावला जाऊ द्यावे, अशी मागणी काँग्रेस समर्थकांनी केली. त्यानंतर बऱ्याच वेळ हे आंदोलन सुरू होते. अखेर त्यानंतर नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्ते हे पायीची उत्तर प्रदेशकडे निघाले. त्यामुळे पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नितीन राऊत यांचावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे युपी पोलीस आणि राज्य सरकार असा वाद पेटण्याची चिन्ह आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशातील आझमगडमधील बांसगावमध्ये एका मागास समुदायातील सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या सरपंचाची हत्या ही उच्च जातीतील व्यक्तींनी केली आहे. ४२ वर्षीय सत्यमेव जयते असं या बांसगावच्या सरपंच नाव आहे. जयते यांनी ठाकूर समाजातील व्यक्ती वाकून नमस्कार केला नाही, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published: