BREAKING : धक्कादायक! CCDचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

BREAKING : धक्कादायक! CCDचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

कॅफे कॉफी डे (CCD)चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्यासंदर्भातील धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सोमवारी (29 जुलै) संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे.

  • Share this:

मंगळुरू, 31 जुलै: कॅफे कॉफी डे (CCD)चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्यासंदर्भातील धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सोमवारी (29 जुलै) संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा अखेर मृतदेह सापडला आहे. नेत्रावती नदीमध्ये सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 72 तासांपासून त्यांचा शोध सुरू होता. मिळालेल्या माहितीवरून, सिद्धार्थ यांनी व्यावसायिक तोट्यामुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याचं उघड झालं आहे. नेत्रावती नदीच्या पुलावरून सिद्धार्थ यांनी नदीत उडी घेऊन जीव दिल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एसएम कृष्णा यांचे जावई होते. या घटनेमुळे सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

(वाचा : काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू)

नेत्रावती पुलावर थांबवली कार अन्...

कॅफे कॉफी डे (CCD)चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ मंगळवारी (30 जुलै) सकाळी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आलं होतं. सोमवारी (29 जुलै) मंगळुरूकडे येताना वाटेत चालकाला आपली कार थांबून ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर फोनवर बोलता-बोलता ते पुलावरून काही अंतर चालून पुढे गेले ते परतलेच नाहीत. ही घटना सोमवारी (29 जुलै) संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.  त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि कोस्ट गार्डची मदत घेण्यात आली होती. जवळपास 200 जणांची टीम त्यांचा शोध घेत होती.

(वाचा  : संतापजनक : शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार)

7 हजार कोटींचं कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, CCDवर 7 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज होतं. सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या CFOसोबत 56 सेकंदांसाठी बातचित केली होती. यामध्ये त्यांनी CFOला आपल्या कंपनीची योग्यपद्धतीनं  देखभाल करण्यास सांगितलं. यावेळेस ते नैराश्यामध्ये देखील होते. CFOसह बोलणी झाल्यानंतर त्यांनी आपला फोन स्विच ऑफ केला आणि ते अचानक गायब झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बरेच तास उलटल्यानंतर सिद्धार्थ यांच्याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. यावरून सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

माजी आयकर अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप

या सर्व घडामोडींदरम्यान सिद्धार्थ यांचं CCDच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेलं पत्र समोर आलं. या पत्रात त्यांनी बिझनेस मॉडेल अपयशी ठरल्याचं बाब नमूद केलं. शिवाय आर्थिक संघर्षदेखील मांडला. सिद्धार्थ यांनी पत्रात लिहिलंय की,' कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याबद्दल वाईट वाटत आहे. मी लढलो, पण आता मी पराभव स्वीकारला आहे. माझ्या एका इक्विटी पार्टनर्सचा दबाव आणखी सहन करू शकणार नाही. माझ्यावर सतत शेअर बायबॅक (पुन्हा खरेदी)करण्यासंदर्भात दबाव टाकला जात आहे. कर्जदात्यांकडूनही दबाव येत आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्धार्थ यांनी एका माजी आयकर अधिकाऱ्याने छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अधिकाऱ्याने मालमत्तेवर जप्ती आणून व्यवसायाचे करार रोखण्याचंही काम केले,असेही त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

(वाचा :सुनेशी लगट करणाऱ्या वासनांध सासऱ्याला अखेर बेड्या)

सिद्धार्थ यांच्या कारचालकानं काय सांगितलं ?

चालकानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असताना सिद्धार्थ बराच वेळ फोनवर कोणासोबत तरी बोलत होते. यानंतर नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांनी कार थांबवण्यास सांगितले आणि खाली उतरले. त्यानंतर ते बेपत्ताच झाले. या माहितीवरून पोलिसांनी सिद्धार्थ यांचे फोन रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली.

सिद्धार्थ यांच्याकडे आहेत कॉफीच्या बागा

आशियामध्ये प्रसिद्ध असलेली कॉफी इस्टेट कंपनी 'कॅफे कॉफी डे' चे मालक संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांचं कुटुंब 150 वर्षे जुनी कॉफीच्या शेती संस्कृतीसोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे कॉफीच्या बागा आहेत. 90 च्या दशकात कॉफीचं मुख्यतः दक्षिण भारतातच घेतले जाते होते. विशेषतः येथील कॉफीला पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रचंड मागणी होती. सिद्धार्थ यांना ही कॉफी सर्वदूर पोहोचवण्याची इच्छा होती. सिद्धार्थ यांचे परिश्रम आणि त्यांचा कौटुंबिक कॉफीचा व्यवसाय यामुळेचे 'कॅफे कॉफी डे'चं स्वप्न सत्यात उतरू शकले.

...आणि 'कॅफे कॉफी डे'चं स्वप्न झालं पूर्ण

'कॅफे कॉफी डे'ची सुरुवात जुलै 1996मध्ये बंगळुरूतील बिग्रेड रोड येथील पहिलं कॉफी शॉप इंटरनेट कॅफेपासून झाली. यानंतर CCDनं देशभरात 'कॅफे कॉफी डे'च्या रुपात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आताच्या घडीला देशभरात 247 शहरांमध्ये सीसीडीचे एकूण 1 हजार 758 कॅफे शॉप आहेत.

SPECIAL REPORT: शाहबानो ते सायराबानो! काँग्रेसची चूक पण भाजपनं इतिहास घडवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 07:09 AM IST

ताज्या बातम्या